सुंदर दिसण्यासाठी करा बर्फानं मसाज!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2017 08:31 PM2017-08-23T20:31:45+5:302017-08-23T20:42:24+5:30

सुंदर दिसण्यासाठी आपण निरनिराळी कॉस्मेटिक्स वापरून बघतो. पण आपल्या फ्रीजमध्ये कायम ठेवलेल्या बर्फाच्या खड्याकडे मात्र आपलं दुर्लक्ष होतं. एक बर्फाचा खडा आणि त्यानं पाच ते सात मीनिटं चेहे-यामसाज केल्यास सौंदर्याची कळी खुलतेच.

Apply one ice cube daily for beauty ritual | सुंदर दिसण्यासाठी करा बर्फानं मसाज!

सुंदर दिसण्यासाठी करा बर्फानं मसाज!

ठळक मुद्दे* चेह-यावर आइसक्यूबनं मसाज केल्यानं चेह-याच्या त्वचेवर ग्लो येतो.* बर्फाच्या खड्यानं चेह-यावर मसाज केल्यानं त्वचेची रंध्र मोकळी होतात आणि कांती नितळ होण्यास मदत होते.* बर्फाच्या खड्यानं चेह-यावर मसाज केल्यानं त्वचेची रंध्र मोकळी होतात आणि कांती नितळ होण्यास मदत होते.* पुटकुळ्या, मुरूमं घालवण्यासाठी बर्फाचा छानच फायदा होतो.* सनबर्नवरही बर्फफायदेशीर आहे.

 

- मोहिनी घारपुरे-देशमुख



एरवी आपली शीतपेयं गारेगार करण्यासाठी वापरला जाणारा बर्फसौंदर्याच्या दुनियेतही फार महत्त्वाची भूमिका बजावतो. एखाद्या मुक्यामारावर डॉक्टर बर्फानं शेकायला सांगतात, उपचारासाठी बर्फाचा वापर हा एवढाच आपल्याला माहित. मात्र यापलिकडेही बर्फाचे खूप उपयोग आहेत.सुंदर दिसण्यासाठी बर्फाचा मसाज याविषयी वाचलं तर तुम्हाल त्याची नक्की खात्री पटेल.

सुंदर करणारे आइस मसाज

1. आइस मसाज  यासाठी आइसक्यूब्स घ्या आणि ते त्वचेवर हळूवारपणे किमान पाच सात मीनिटांसाठी फिरवत राहा. विशेषत: चेह-यावर आइसक्यूबनं मसाज केल्यानं चेह-याच्या त्वचेवर ग्लो येतो.
2. मेकअपपूर्वी मसाज - एखाद्या मोठ्या समारंभात जायचं असेल किंवा जर तुम्ही टीव्ही किंवा नाटकातील कलाकार असाल तर तुम्हाला चेह-यावर अनेकदा भरपूर मेकअप चढवावा लागतो. त्यामुळे त्वचेची रंध्र मोकळी रहात नाहीत.आणि त्यामुळे कालांतरानं चेह-याच्या त्वचेला खूप हानी पोचते. म्हणूनच प्रत्येकवेळी मेकअप चढवण्यापूर्वी आनि मेकअप उतरवल्यानंतर बर्फाच्या खड्यानं चेह-यावर मसाज करावा. यामुळे त्वचेची रंध्र मोकळी होतात आणि कांती नितळ होण्यास मदत होते. तसेच चेह-याची त्वचा सतत छेडली गेल्यानं लालसर होते ती लालीही बर्फाच्या खड्यानं मसाज केल्यानं कमी होण्यास मदत होते.
3. आयब्रोजला मसाज - आयब्रोज किंवा अप्परलिप्स करताना अनेकजणींना खूपच त्रास होतो. त्यामुळे प्लकर वगैरेचा उपयोगही काहीजणी करतात. ब्यूटी थेरपिस्टच्या मते, प्लकींग करण्यापूर्वी त्या जागी जर बर्फाच्या खड्यानं काही मीनिटें मसाज केला तर प्लकींगच्या वेळी वेदना होत नाहीत. तसेच त्यानंतर त्वचेवर येणारी लालीही कमी प्रमाणात येत असल्याचे दिसतं.

 


4. पुटकुळ्या, मुरूमं घालवण्यासाठी बर्फाचा छानच फायदा होतो. जर तुमच्या चेह-यावर मुरूमं, पुटकुळ्या येत असतील आणि त्या फुटून तिथली जागा लाल होत असेल तर तुम्ही एका मऊ, तलम कपड्यात तीन चार बर्फाचे खडे घ्या आणि त्यानं चेह-याच्या लाल झालेल्या जागी दोन तीन मीनिटं मसाज करा. सलग मसाज करू नका, त्याऐवजी मध्येमध्ये काही मीनिटं थांबा. तुम्हाला याचा नक्कीच फायदा दिसेल. फक्त त्यासाठी थोडा धीर धरावा लागेल.
5. सनबर्नवरही बर्फफायदेशीर आहे. सनबर्न अर्थात उन्हामुळे त्वचेवर झालेल्या जखमा, काळी पडलेली त्वचा या सगळ्यावर बर्फाचा मसाज हे चांगलं उत्तर आहे. यामुळे सनबर्नची वेदना नक्कीच कमी होते. तसेच जळजळणा-या भागाला थंडावा मिळून आराम वाटतो.
6. डोळ्यांना सूज येत असल्यास, डोळे लाल होत असल्यास, दररोज एक बर्फाचा खडा डोळ्यांवर चोळा. यामुळे डोळ्यांना थंडावा वाटेल आणिसूज वगैरे असेल तर कमी होण्यास मदतच होईल.

 

Web Title: Apply one ice cube daily for beauty ritual

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.