Amazon Fashion Week Stage with Multiple Themes | ​मल्टिपल थीमने रंगले अमेझॉन फॅशन वीकचे स्टेज

फॅशन इंडस्ट्री म्हटली की, वेगवेगळे डिझायनर्स आणि त्यांच्या भन्नाट डिझाईन्स आणि डिझाईन्सचे प्रदर्शन घडवणे म्हणजेच फॅशन शो. या इंडस्ट्रीमध्ये नेहमी वेगवेगळे फॅशन शो होत असतात. यामार्फत फॅशन इंडस्ट्रीमध्ये वेगवेगळे ट्रेंड्स येत असतात. दिल्लीमध्ये नुकताच पार पडलेल्या अमेझॉन फॅशन वीकमध्ये आदित्य बिर्ला ग्रुपचे "लिवा क्रेम"”ने ऑटम-विंटर कलेक्शन सादर केले. या फॅशन शोचे "लिवा" हे स्वतः गोल्ड स्पॉन्सर असून लिवाच्या नैसर्गिक कापडापासून बनवलेल्या डिझाईन्स यावेळी सादर करण्यात आल्या. डिझायनर अंजू मोदी, ईशा अमीन, गौरव जय गुप्ता, निदा महमूद, श्रुती संचेती आणि वेन्डेल्ड रॉड्रिक्स यांनी या शो मध्ये आपले डिझाईन्स सादर केले.
हा फॅशन शो वेगवेगळ्या थीम्सने परिपूर्ण होता. मिस्ट्रीकल फॉरेस्ट या हटके अशा थीममध्ये डिझायनर अंजु मोदी यांनी निसर्ग आणि कला यांची सांगड घातली आहे. आपल्या कानावर नेहमीच वेगवेगळ्या गूढकथा पडत असतात. या गूढकथांमध्ये आपण ज्याप्रक्रारे आपले भावविश्व रंगवत असतो. अशा भावविश्वाचे चित्रण त्यांच्या डिझाईनर्स मधून दिसत आहे. एक मुक्त आणि आजच्या युगात जगणारी स्त्री जी तिच्या आपल्या कम्फर्ट झोनमध्ये राहणे पसंत करते. खास त्या महिलांसाठी काळजीपूर्वक तयार केलेले डिझाईन्स म्हणजे "अनटेमड डेसर्ट." या वेगळ्या थीमचे सादरीकरण इशा अमीनने केले.
जुन्या जमान्यात मुलींच्या पेहरावात फुलांचे नक्षीकाम हे आपण पाहिले आहे. आताच्या फॅशनमध्ये हीच स्टाईल परत आणण्याचे काम निदा महमूद यांनी केले आहे. डोळ्यांना प्रसन्न वाटावे अशा रंगांसोबत पानाफुलांचे नक्षीकाम यांची उत्तम सांगड या कलेक्शनमध्ये सादर करण्यात आले. थंडीच्या मौसमात वेगवेगळ्या रंगांची फुले बहरतात, अगदी रस्त्यावरून जातानादेखील ही लहान लहान गुलाबी, पिवळ्या छटांची फुले दिसतात. डिझायनर श्रुती संचेती यांनी याच लहान पण आकर्षक फुलांची प्रेरणा घेऊन या वर्षीच्या फॅशन वीकमध्ये आपले कलेक्शन सादर केले.
सफेद रंग हा सर्वांना मोहित करणारा रंग आहे. अमेझॉन फॅशन वीकमध्ये लिवाची डिझायनर वेन्डेन रॉड्रिक्स यांनी व्हाईट कार्पेट कलेक्शनमार्फत आपल्या कलेचे सादरीकरण केले. आदित्य बिर्ला ग्रुपचे लिवा हे फॅब्रिक नैसर्गिक फॅब्रिक आहे. या फॅब्रिकमधून निर्माण झालेले कपडे जसे की, कुर्ती, वेस्टर्न आउटफिट, साडी हे नेह्मीच आकर्षण ठरले आहेत. अमेझॉन फॅशन वीकमध्ये लिवामार्फत तयार झालेल्या कपड्यांच्या सादरीकरणामुळे लिवाने सर्वांचे लक्ष घेतले.
Web Title: Amazon Fashion Week Stage with Multiple Themes
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.