या 8 प्रकारच्या कुर्तींमध्ये तुम्ही नेहमीच दिसाल फॅशनेबल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2018 02:44 PM2018-03-06T14:44:08+5:302018-03-06T14:54:17+5:30

वेगवेगळ्या प्रकारच्या कुर्ती तुमच्याकडे असतील तर तुमच्या रोजच्या फॅशन स्टाईलचा प्रश्नच मिटला.

8 indian style kurti for fashionable women | या 8 प्रकारच्या कुर्तींमध्ये तुम्ही नेहमीच दिसाल फॅशनेबल

या 8 प्रकारच्या कुर्तींमध्ये तुम्ही नेहमीच दिसाल फॅशनेबल

googlenewsNext
ठळक मुद्देमहिलांचं शॅापिंग करताना पहिलं लक्ष कुर्तींकडे जातं.  वेगवेगळ्या मार्केटमध्ये कुर्तींचे निरनिराळे ट्रेन्ड्स पाहायला मिळतात. आहेत त्या कुर्तींमध्येही तुम्ही अगदी फॅशनेबल दिसू शकता. शिवाय शॉपिंग कधीही आणि कुठेही करता येते.

मुंबई : महिलांचं शॅापिंग करताना पहिलं लक्ष कुर्तींकडे जातं.  वेगवेगळ्या मार्केटमध्ये कुर्तींचे निरनिराळे ट्रेन्ड्स पाहायला मिळतात. शॉपिंग करण्यासाठी काही खास समारंभ असावाच, अशी काही आवश्यकता नसते. शॉपिंग कधीही आणि कुठेही करता येते. शिवाय, वेगवेगळ्या प्रकारच्या कुर्ती तुमच्याकडे असतील तर तुमच्या रोजच्या फॅशन स्टाईलचा प्रश्नच मिटला. आहेत त्या कुर्तींमध्येही तुम्ही अगदी फॅशनेबल दिसू शकता.

1. टेल कट कुर्ती 

यामध्ये कुर्तीची उंची पुढील बाजून कमी व मागील बाजून जराशी लांब असते. कोणत्याही पार्टीला जात असताना पॅन्टवर तुम्ही ही कुर्ती घालू शकता. सध्या या कुर्तींचा ट्रेन्ड अधिक असल्याचं पाहायला मिळत आहे. शेपटीच्या आकाराप्रमाणे कुर्ती असल्यामुळे हिला 'टेल कट' कुर्ती म्हणतात.

2. 'ए' स्टाईल कुर्ती 

कॅालेजमधील मुलींमध्ये या स्टाईलची कुर्ती खूपच प्रसिद्ध आहे. या कुर्तीचा आकार वरून निमुळता व खालच्या बाजूने पसरलेला असतो. खालून घेर असल्याने चुडीदार व लेंगीजवर ही कुर्ती सुंदर दिसते

3. अनारकली कुर्ती 

ट्रेडिशनल लुकसाठी ही कुर्ती तुम्ही कोणत्याही समारंभात किंवा कोणत्याही सणादिवशी वापरता येऊ शकते. ऑफिस, कॅालेजसाठी साध्या प्रकारातील अनारकली कुर्तीही तुम्हाला बाजारात मिळतात.

आणखी वाचा - चित्रपटात वापरलेले कपडे आणि वस्तु नंतर कुठे जातात ?

4. गाऊन कुर्ती 

बॅालिवूडमधील तारका परिधान करतात त्याप्रमाणे या कुर्तीला रॅायल लूक असतो. या प्रकारात कुर्ती लांबीला उचं असतात व यात तुम्हाला प्रिंटेड व डिझायनर असे दोन प्रकार मिळतात. 

5. शर्ट कुर्ती 

या कुर्तीचं डिझाईन शर्टप्रमाणे असते. तसंच या कुर्ती मुलींना आवडणाऱ्या फॅब्रिक आणि डेनिमच्या कापडामध्येच मिळतात म्हणूनच या कुर्तींना विशेष मागणी असते.

6.  कुर्ती विथ जॅकेट 

कुर्ती व त्यावर डायमंडने भरलेलं जॅकेटची क्रेझ सध्या तरुणींमध्ये अधिक आहे. विशेष समारंभासाठीच या कुर्ती अधिक प्रमाणात वापरल्या जात असल्यानं यांची मागणी प्रचंड वाढली आहे. 

आणखी वाचा - तुम्ही लिपस्टिक कोणत्या रंगाची लावता? तुमची लिपस्टिक तुमच्याबद्दल खूप काही सांगते !

7. कुर्ती विथ पॅाकेट 

साध्या कुर्तीप्रमाणेच असणाऱ्या पण बाजूला पॅाकेट नसून तो कुर्तीच्यावर असणाऱ्या या फॅशनेबल कॅाटन कुर्तीची मागणी अधिक वाढली आहे.साधी पण स्टाईलीश लुक देणारी ही कुर्ती काही ठराविक मार्केटमध्येच मिळते.

8. शॅार्ट कुर्ती 

मुलींमध्ये कायम ट्रेन्डमध्ये असणारी, जीन्सवर वापरण्यास अगदी कम्फर्टेबल असतं. शॉर्ट कुर्ती जीन्स तसंच पलाझोवरही वापरता येते. विशेष म्हणजे ही कुर्ती कोणत्याही वयोगटातील स्त्रियांवर शोभून दिसते.

आम्ही तुम्हाला कुर्त्यांचे हे ८ प्रकार दाखवले आहेत. आपल्या पेहरावात त्यांचा समावेश करून तुम्ही स्वत:ला फॅशनेबल म्हणवून घेऊ शकता. मुंबईच्या कोणत्याही मार्केटमध्ये तुम्हाला या सगळ्या प्रकारच्या कुर्तीज सहज आणि स्वस्तात मिळू शकती. 

Web Title: 8 indian style kurti for fashionable women

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.