Video : 'संजू'चा टीझर पाहून रणबीरचे फॅन झाले ऋषी कपूर, बघा त्यांची रिअॅक्शन!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2018 04:21 PM2018-05-28T16:21:48+5:302018-05-28T16:23:01+5:30

रणबीरच्या लूक्सचं आणि त्याच्या अभिनयाचं सगळेजण कौतुक करत आहेत. अशात अभिनेते ऋषी कपूर यांचीही या टीझरवर प्रतिक्रिया आलीये. 

Watch Rishi Kapoors epic reaction to Sanju teaser | Video : 'संजू'चा टीझर पाहून रणबीरचे फॅन झाले ऋषी कपूर, बघा त्यांची रिअॅक्शन!

Video : 'संजू'चा टीझर पाहून रणबीरचे फॅन झाले ऋषी कपूर, बघा त्यांची रिअॅक्शन!

मुंबई : संजय दत्त याच्या जीवनावर आधारित संजू या सिनेमाचा टीझर काही दिवसांपूर्वी रिलीज करण्यात आला होता. या बायोपिकमध्ये रणबीर कपूर संजय दत्तची भूमिका साकारणार आहे. रणबीरच्या लूक्सचं आणि त्याच्या अभिनयाचं सगळेजण कौतुक करत आहेत. अशात अभिनेते ऋषी कपूर यांचीही या टीझरवर प्रतिक्रिया आलीये. 

ऋषी कपूर यांची टीझरवरील रिअॅक्शन आयपीएलच्या क्लोजिंग सेरमनीवेळी पहिल्यांदा बघायला मिळाले. आयपीएल फायनलच्या पार्टीत रणबीर संजूच्या प्रमोशनसाठी आला होता. इथेच ऋषी कपूर यांनी संजूचा टीझर पाहिला आणि त्यानंतर त्यांच्या रिअॅक्शनचा व्हिडीओ समोर आलाय. 



 

या व्हिडीओत रणबीरचं कौतुक करत ते म्हणाले की, मला एका क्षणासाठी असं वाटलं की, संजय दत्त स्क्रीनवर आहे. मुलाने खरंच खूप भारी काम केलंय. मला त्याच्या अभिमान आहे. मला कळलेच नाही की, रणबीर आलाय. त्याने चांगलं काम केलंय आणि आणखी चांगलं करावं लागेल. 

असे सांगितले जात आहे की, हा व्हिडीओ राजकुसार हिराणी यांनी तयार केला. संजू हा सिनेमाचा ट्रेलर आता 30 मे रोजी रिलीज केला जाणार आहे. 

Web Title: Watch Rishi Kapoors epic reaction to Sanju teaser

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.