अदनान सामीवर पाकी बरळले, दहशतवादाचा 'राजदूत' होता का बाप?

By Admin | Published: October 2, 2016 01:03 PM2016-10-02T13:03:49+5:302016-10-02T13:03:49+5:30

सामीच्या टविटवर पाकी बरळले असून त्याच्यावर चांगलंच तोंडसूख घेण्यात येत आहे. यामध्ये पाकिस्तानी बँड जुनूनचे सलमान अहमद यांचाही समावेश आहे.

Was the 'Ambassador of Terror' to the father of Adnan Sami, father? | अदनान सामीवर पाकी बरळले, दहशतवादाचा 'राजदूत' होता का बाप?

अदनान सामीवर पाकी बरळले, दहशतवादाचा 'राजदूत' होता का बाप?

googlenewsNext

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २ : सर्जिकल स्ट्राइकद्वारे 'दहशतवाद्यांविरोधात केलेल्या कारवाईबद्दल आपल्या धाडसी जवानांचं आणि पंतप्रधान मोदींचं मूळचा पाकिस्तानी असलेला मात्र, नुकतंच भारतीय नागरिकत्व मिळालेला गायक अदनान सामीने अभिनंदन केलं होतं. सामीच्या या ट्वीटने पाकिस्तानच्या जखमेवर मीठ चोळायचंच काम केलं आहे. पाकिस्तानातून मात्र, सामीच्या या ट्विटवर तिखट प्रतिक्रिया उमटत असून सामीवर चांगलंच तोंडसूख घेण्यात येत आहे. यामध्ये पाकिस्तानी बँड जुनूनचे सलमान अहमद यांचाही समावेश आहे.

सलमान अहमदने अदनानला एक संदेश पाठवला आहे. त्यात तो लिहितो, परमाणु देशाअंतर्गत युध्दामध्ये कोणाचाही विजय होत नसतो हे पाकिस्तानी राजदूताचा मुलगा या नात्याने तुला कळायला हवे. तुझ्या अजब तर्कानुसार तुझ्या वडीलांनी दहशतवाद्यांचा राजदूत म्हणून सेवा केली आहे. तू आपल्या आई वडीलांनाही सोडले आहेस. एका ट्विटमध्ये म्हटले आहे, अदनान भाई, तू एक पाकिस्तानी आहेस. त्यामुळे पाकिस्तानी सैन्यात किती ताकद आहे याचा चांगला अंदाज असेल."


पाकिस्तान आणि दहशतवाद यांच्यात फरक करण्यात हे लोक अपयशी ठरल्याचे अदनानने म्हटले. भारतीय सैनिकांना सलाम केल्यानंतर अदनानला पाकिस्तानी नागरिकांच्या रागाला सामोरे जावे लागले. लगेच त्याने ट्विटरवर त्याचे उत्तर दिले. " पहिल्या ट्विटमुळे पाकिस्तानी भडकले आहेत. याचा अर्थ 'पाकिस्तान आणि दहशतवाद' हे एकसारखेच असल्याचे या लोकांना वाटते. हे म्हणजे स्वतःवरच गोल मारण्यासारखे आहे. दहशतवाद थांबवा," असे त्याने ट्विटरवर लिहिले आहे.

अदनानला यावर्षीच्या सुरुवातीला भारतीय नागरिकत्व बहाल करण्यात आले होते. अदनानचे वडील अरशद सामी खान हे राजकिय तज्ञ होते. त्यांनी जगातील १४ देशामध्ये पाकिस्तानचे राजदूत म्हणून काम केले होते.

 

Web Title: Was the 'Ambassador of Terror' to the father of Adnan Sami, father?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.