Vidya-Mangesh's unique chemistry in Bholi Surat | ‘भोली सुरत’मध्ये विद्या-मंगेशची अनोखी केमिस्ट्री!

विद्या बालन सध्या ‘एक अलबेला’ या मराठी चित्रपटामुळे चांगलीच चर्चेत आहे. यात तिच्यासोबत मंगेश देसाई भगवान दादाच्या भूमिकेत दिसणार आहे. तिने बॉलीवूडमध्ये तिच्या सुंदर अभिनयाने आणि पॉवरफुल स्क्रीन प्रेझेन्स यांच्यामुळे तिला ‘एक अलबेला’ या मराठी चित्रपटात भूमिका साकारता येणार आहे. तिच्या या चित्रपटातील ‘भोली सुरत’ हे गाणे नुकतेच आऊट करण्यात आले आहे. भगवान दादा आणि गीता बाली यांच्या भूमिकेतील या गाण्यावर मंगेश देसाई आणि विद्या बालन यांनी अतिशय सुंदर डान्स साकारला आहे. हा चित्रपट भगवान दादा यांच्या जीवनावर आधारित आहे.


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.