'त्या' निर्मात्यानं मला सेक्सची ऑफर दिली होती, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक गौप्यस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2018 02:04 PM2018-04-26T14:04:28+5:302018-04-26T14:04:41+5:30

आता राष्ट्रीय पुरस्कार विजेती असलेली मराठी अभिनेत्री उषा जाधवनंही कास्टिंग काऊचचा अनुभव कथन केलाय. 

Usha Jadhav speak out against sexual harassment in Bollywood | 'त्या' निर्मात्यानं मला सेक्सची ऑफर दिली होती, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक गौप्यस्फोट

'त्या' निर्मात्यानं मला सेक्सची ऑफर दिली होती, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक गौप्यस्फोट

googlenewsNext

मुंबई:  सद्यस्थितीत कास्टिंग काऊचचा मुद्दा जोरदार चर्चिला जातोय. सरोज खान यांनी कास्टिंग काऊचचं समर्थन केल्यानंतर अनेकांनी यावर बोलण्यास सुरुवात केलीय. विशेष म्हणजे राजकारणातही महिलांबरोबर कास्टिंग काऊच होत असल्याचं सांगत काँग्रेसच्या माजी खासदार रेणुका चौधरींनी मोठा गौप्यस्फोट केला होता. आता राष्ट्रीय पुरस्कार विजेती असलेली मराठी अभिनेत्री उषा जाधवनंही कास्टिंग काऊचचा अनुभव कथन केलाय. 

चित्रपटात काम करण्याच्या इच्छेखातर मी घर सोडले आणि पळून मुंबई दाखल झाले. परंतु इथे चित्रपटात काम देतो सांगून अनेकांनी माझं लैंगिक शोषण केलं, असा धक्कादायक अनुभव उषा जाधवने सांगितला आहे. चित्रपटसृष्टीत कास्टिंग काऊचचा अनुभव येणं ही सामान्य गोष्ट आहे. निर्माते किंवा चित्रपटसृष्टीतील इतर कोणाकडूनही लैंगिक शोषण हे नेहमीचीच बाब आहे, असंही उषा जाधव म्हणाली. मला एकदा विचारणा केली होती की, जर संधी दिली, तर बदल्यात काय देशील? त्यावेळी माझ्याकडे पैसे नसल्याचं मी त्यांना सांगितलं होतं. तेव्हा समोरची व्यक्ती म्हणाली, नाही.. पैशाची गोष्ट नाही, जर निर्माता किंवा डायरेक्टर अशा कोणाला तुझ्यासोबत झोपायचं असेल तर तू तयार आहेस का, अशी विचारणा केल्याचं उषा जाधवानं सांगितलं. अभिनेत्री म्हणून तुला स्वखुशीनं संबंध ठेवावे लागतील.

तसेच तो बोलत असताना माझ्या शरीराच्या कुठेही हात लावत होता. त्यानं माझं चुंबनही घेतलं. त्या प्रकारानं मी अचंबित झाले.  मी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला असता चित्रपटसृष्टीत काम करायचंय की नाही, अशी विचारणा त्यानं केली. तसेच तुझी वृत्ती योग्य नसल्याचंही तो म्हणाल्याचं उषा जाधवनं सांगितलं. कास्टिंग काऊचवर बीबीसी डॉक्युमेंटरी बनवत आहे. या डॉक्युमेंटरीमध्ये उषा जाधव, राधिका आपटे यासारख्या अभिनेत्रींची कास्टिंग काऊचबाबतची मतं जाणून घेतली आहेत. लवकरच ही डॉक्युमेंटरी प्रदर्शित होणार आहे.

कोण आहे उषा जाधव?
उषा जाधव ही राष्ट्रीय पुरस्कार विजेती मराठमोळी अभिनेत्री आहे. उषा जाधवचा जन्म महाराष्ट्रातील कोल्हापूरमध्ये झाला. 2012 प्रदर्शित झालेला 'धग' सिनेमा तिच्या आयुष्यातील टर्निंग पॉईंट ठरला. या चित्रपटाने तिला राष्ट्रीय पुरस्कारही मिळवून दिला. या सिनेमात तिने एका मुलाच्या आईची भूमिका साकारली होती

Web Title: Usha Jadhav speak out against sexual harassment in Bollywood

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.