मुंबई- हिंदी चित्रपटसृष्टीतील जवळपास सर्वच अभिनेत्यांची आकर्षक बॉडी आणि सिक्स पॅक अ‍ॅब्स पाहायला मिळतात, पण आता मराठी चित्रपटसृष्टीतही सिक्स पॅक अ‍ॅबची चर्चा रंगू लागली आहे. याचे कारण आहे अभिनेता उमेश कामत. पीळदार शरीरयष्टीतील उमेश कामतचे काही फोटोज सध्या सोशल साइट्सवर चर्चेचा विषय बनले आहेत. मराठी इंडस्ट्रीमध्ये सिक्स पॅक अ‍ॅब करणारा उमेश पहिलाच अभिनेता आहे. या संदर्भात उमेशने ‘लोकमत सीएनएक्स’शी दिलखुलास गप्पा मारून, त्याचा फिटनेस फंडा सांगितला.
सिक्स पॅक अ‍ॅब करण्याची कल्पना तुला कशी सुचली?
- मी खरंतर माझ्या फिटनेसबाबत फारच जागरुक असतो. मला व्यायाम करायलाही आवडतो. बऱ्याच दिवसांपासून सिक्स पॅक अ‍ॅब्स बनवायचा माझा विचार होता. त्यासाठी मी चार महिन्यांपासून मेहनत घेत होतो. शैलेश परुळेकर यांनी यासाठी मला प्रशिक्षण दिले.
तू कशाप्रकारे मेहनत घेतलीस?
- माझ्यासाठी सिक्स पॅक करणे हे एक आव्हानच होते. पण त्यासाठी कोणत्याही शॉर्टकटचा वापर मी केला नाही. माझे शरीर साथ देईल तेवढाच व्यायाम मी रोज करायचो. सर्वात आधी मी जिभेवर नियंत्रण मिळवले. गोड किंवा तेलकट, बाहेरचे पदार्थ खाणं टाळले. प्रिया मला रोज घरचा डबा द्यायची. जिममध्ये मी दररोज दोन ते तीन तास व्यायाम करायचो.
मराठी चित्रपटसृष्टीत तुझ्या सिक्स पॅकची जोरदार चर्चा सुरूआहे, त्यांच्याकडून तुला मिळालेली बेस्ट कॉम्प्लिमेंट कोणती ?
- माझे फोटो पाहिल्यानंतर मला इंडस्ट्रितील बऱ्याच जणांचे फोन आणि मेसेज आले. सगळ्यांनी माझ्या सिक्स पॅकचे कौतुक केले. तू आमचा इन्स्पिरेशन बनला आहेस. तुझ्याकडे पाहिल्यानंतर आम्हालाही जिममध्ये जाण्याची प्रेरणा मिळतेय. असे जेव्हा मला काही अभिनेत्यांनी सांगितले तेव्हा ती माझ्यासाठी बेस्ट कॉम्प्लिमेंट होती.
ज्यांना सिक्स पॅक अ‍ॅब करायचे आहेत, त्यांच्यासाठी तू काय टिप्स देशील ?
- कोणतीही गोष्ट मिळविण्यासाठी मेहनतीला पर्याय नाही. तुम्हाला पटकन काहीच मिळत नाही. नेहमी दूरदृष्टीचा विचार करायला हवा. त्यामुळे जर सिक्स पॅक करायचे असतील तर वेळ आणि मेहनत या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत असे मी सांगेन. त्यासाठी नियमित व्यायाम, सायकलिंग, योगा आणि योग्य डाएट करायला पाहिजे.
तुझे सिक्स पॅक पाहिल्यानंतर तुला चित्रपटांच्या काही आॅफर्स आल्या का?
- माझे फोटो पाहिल्यानंतर मला बऱ्याच निर्माते आणि दिग्दर्शकांकडून चित्रपटांसाठी फोन आले. पण सध्या तरी काही फायनल झालेलं नाही. मला त्यातली जर एखादी कथा आवडली तर मी निश्चितच स्वीकारने आणि त्यानिमित्ताने प्रेक्षकांनाही पडद्यावर माझे सिक्स पॅक पाहायला मिळतील.


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.