- गिताजंली अंबरे

बॉलिवूडमध्ये आलेली प्रत्येक अभिनेत्री आपल्या करिअरमध्ये यशस्वी होतेच असे नाही. ज्या अभिनेत्रींचे बॉलिवूडमध्ये नाणं खणखणीत वाजले नाही त्यांनी उद्योगपतींशी संसार थाटून बॉलिवूडला रामराम ठोकला. अशाच काही अभिनेत्रींचा घेतलेला हा आढावा.
ईशा देओल -
2002मध्ये आलेल्या "कोई मेरे दिलसे पुछे" या चित्रपटातून ईशाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. याचित्रपटासाठी तिला बेस्ट डेब्यूचा पुरस्कारही मिळाला. त्यानंतर रूपेरी पडद्यावर आलेले "ना तुम जानो ना हम", "क्या दिल ने कहा", "कुछ तो है" हे तिचे चित्रपट बॉक्स आॅफिसवर आपटले. ड्रीम गर्ल हेमालीनी आणि धमेंद्र यांच्या लेकींकडून बॉलिवूडला अनेक अपेक्षा होत्या. मात्र त्या पूर्ण करण्यात तिला अपयश आले. 2012 मध्ये तिने भरत तख्यानी या उद्योगपतींसह लग्नबे़डीत अडकून बॉलिवूडमधून एक्झिट घेतली.


असिन -
साऊथमध्ये आपल्याला करिअरला सुरुवात करणाऱ्या असिन थोट्टमकलला बॉलिवूडमध्ये फारसे यश मिळवता आले नाही. आमिरसोबत आलेल्या गजनी या चित्रपटामुळे असिन प्रकाशझोतात आली मात्र त्यानंतर तिच्या वाटेला फारसे चित्रपट आले नाहीत. आसिन उद्योगपती राहुल शमार्शी विवाह बंधनात अडकली.

अमृता अरोरा -
राख, मुझसे शादी करोगी, कितने दूर कितने पास यासारख्या काही मोजक्याच चित्रपटात आपल्याला अमृता अरोराला दिसली होती. बॉलिवूडमध्ये आपल्या मोठ्या बहिणीप्रमाणे अमृताला यश मिळवता आले नसल्याने ती बॉयफ्रेंड आणि उद्योगपती असलेल्या शकील लद्दाखबरोबर लग्न करुन संसारात रमली.

गायत्री जोशी
आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित "स्वदेस" या चित्रपटात गायत्री आपल्याला शाहरुख खानसोबत दिसली होती. स्वदेस आधी काही म्युझिक अल्बममध्ये आपल्याला ती दिसली होती. स्वदेस व्यतिरिक्त एकही चित्रपट तिच्या वाट्याला आला नाही. यानंतर तिने 2005मध्ये बिझनेसमन विकास आॅबेरॉयसोबत लग्न करुन बॉलिवूडला बाय बाय केले.