‘होणार सून मी या घरची’ या मालिकेतून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री तेजश्री प्रधान ही सध्या अमेरिकेमध्ये आहे. ‘कार्टी काळजात घुसली’ या नाटकाच्या प्रयोगासाठी गेले कित्येक दिवस ती अमेरिकेतच आहे. त्यामुळे तिला पुन्हा मायदेशी परतायचे वेध लागले आहेत. विशेष म्हणजे अमेरिकेत तिच्या या नाटकाचे प्रयोगदेखील हाऊसफुल जात आहेत. अमेरिकेत इतकं भरभरून प्रेम मिळत असूनही तेजश्रीला आपल्या मातृभूमीचे ओढ लागलेली दिसतेय. तिच्या सोशल मीडियावरील स्टेटसवरून या गोष्टीचा उलगडा झालाय. नुकतेच तेजश्रीने सोशल मीडियावर चालतानाचा एक फोटो अपलोड केला आहे. या फोटोखाली तिने मी भारतात येण्यासाठी खूप उतावळी झाली असल्याचे लिहिले आहे. तिच्या या स्टेटसला तिच्या चाहत्यांनीदेखील भरभरून प्रतिसाद दिला आहे. ‘कम फास्ट तेजू’ म्हणत एका चाहत्याने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.