गळफास घेऊन या लोकप्रिय अभिनेत्रीने केली आत्महत्या, जाणून घ्या काय आहे कारण?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2018 04:46 PM2018-07-18T16:46:05+5:302018-07-18T16:51:19+5:30

प्रियंका ही तमिळ टीव्ही मालिका 'वामसम' मधील ज्योतिकाच्या भूमिकेमुळे चांगलीच लोकप्रिय झाली होती. या मालिकेत ती बाहुबली फेम अभिनेत्री रम्या कृष्णन यांच्यासोबत दिसली होती. 

Tamil Tv actress Priyanka commits suicide, shocking reason | गळफास घेऊन या लोकप्रिय अभिनेत्रीने केली आत्महत्या, जाणून घ्या काय आहे कारण?

गळफास घेऊन या लोकप्रिय अभिनेत्रीने केली आत्महत्या, जाणून घ्या काय आहे कारण?

googlenewsNext

मुंबई : तमिळ टीव्ही इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री प्रियंकाने बुधवारी आत्महत्या केली असून यामुळे मनोरंजन क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, टीव्ही अभिनेत्री प्रियंकाने वलासारावक्कम येथील आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. 

In Pics: Priyanka, Tamil actress, Commits Suicide Because She Didn

प्रियंका ही तमिळ टीव्ही मालिका 'वामसम' मधील ज्योतिकाच्या भूमिकेमुळे चांगलीच लोकप्रिय झाली होती. या मालिकेत ती बाहुबली फेम अभिनेत्री रम्या कृष्णन यांच्यासोबत दिसली होती. 

In Pics: Priyanka, Tamil actress, Commits Suicide Because She Didn

प्रियंकाच्या मृत्यूची माहीती सर्वातआधी तिच्या मोलकरणीने दिली. बुधवारी सकाळी तिची मोलकरीन जेव्हा घरी आली तेव्हा तिने प्रियंकाचा मृतदेह पंख्याला लोंबकळलेला पाहिला. त्यानंतर तिने सर्वांना माहिती दिली. 

In Pics: Priyanka, Tamil actress, Commits Suicide Because She Didn

सोबतच प्रियंकाने एक सुसाइड नोट लिहून ठेवली असून त्यात आत्महत्येचं कौटुंबिक कारण सांगितलं आहे. मीडिया रिपोर्टनुसार, अभिनेत्री प्रियंकाचं लग्न साधारण ३ वर्षांपूर्वी लग्न झालं होतं. पण अजून तिला बाळ झालं नव्हतं. परिवारात भांडणं होण्याचं मुख्य कारण हेच सांगितलं जात आहे. प्रियंकाचा मृतदेह पोस्टमार्टेमसाठी पाठवण्यात आला आहे. पोलीस पुढील चौकशी करत आहे.

Web Title: Tamil Tv actress Priyanka commits suicide, shocking reason

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.