व्हायरल सत्य: पाकिस्तानला शाहरुखनं खरंच 45 कोटींची मदत दिली होती ?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2019 10:55 AM2019-02-20T10:55:24+5:302019-02-20T10:55:37+5:30

पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर शहीद जवानांच्या कुटुंबीयांसाठी बॉलिवूड सिने-तारकांनी मदतीचा हात पुढे केला आहे.

stop fake news against srk hashtag trends on social media after fake news viral against the actor | व्हायरल सत्य: पाकिस्तानला शाहरुखनं खरंच 45 कोटींची मदत दिली होती ?

व्हायरल सत्य: पाकिस्तानला शाहरुखनं खरंच 45 कोटींची मदत दिली होती ?

googlenewsNext

नवी दिल्ली- पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर शहीद जवानांच्या कुटुंबीयांसाठी बॉलिवूड सिने-तारकांनी मदतीचा हात पुढे केला आहे. शहिदांच्या मदतीसाठी अमिताभ बच्चन, अक्षय कुमार, सलमान खान आणि कैलाश खेर पुढे सरसावले आहेत. या अभिनेत्यांनी कोट्यवधींचं दान केलं आहे. परंतु याचदरम्यान शाहरुख खानसंदर्भातही काही पोस्ट व्हायरल होत आहेत. शाहरुख खाननं जवानांना अद्यापही मदत न केल्यानं त्यांच्यावर टीकाही केली जातेय. शाहरुख खाननं पाकिस्तानमधल्या गॅस दुर्घटनेतील लोकांना 45 कोटींची मदत केली होती. याचा एक व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला. परंतु ही न्यूज फेक आहे. शाहरुख खानची बदनामी करण्यासाठी अशा प्रकारच्या न्यूज पेरल्या जात असल्याचं आता समोर आलं आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर शाहरुख खानचे चाहते त्याच्या बचावासाठी पुढे आले आहेत.

शाहरुखच्या चाहत्यांनी त्यासाठी StopFakeNewsAgainstSRK नावाचं हॅशटॅग बनवलं असून, त्यात शाहरुखसंदर्भात पसरवण्यात येणाऱ्या खोट्या वृत्ताचा पर्दाफाश करण्यात आला आहे. ट्विटमध्ये एक चाहता लिहितो, शाहरुख जेव्हा काही दान करतो तेव्हा ते गुप्तरीत्या करत असतो.


विशेष म्हणजे यासाठी शाहिद, सिटीलाइट्स सारख्या चित्रपटांचे दिग्दर्शक हन्सल मेहताही शाहरुखला पाठिंबा दिला आहे. तसेच शाहरुखसंदर्भात चुकीच्या बातम्या पसरवू नये, अशी विनंती केली आहे.


शहिदांना मदत न दिल्यानं शाहरुखच्या देशभक्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातंय. गेल्या वर्षी शाहरुखसंदर्भात हा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यानंतर शाहरुखला टीकाही सहन करावी लागली होती.
पण अशावेळी शाहरुखचे चाहते त्याच्या मदतीला आले आणि बघता बघता, ‘स्टॉप फेक न्यूज अगेन्स्ड एसआरके’ नावाचा हॅशटॅग ट्रेंड करू लागला. शाहरुखच्या चाहत्यांनी अनेक ट्वीट करत, हा व्हिडिओ फेक असल्याचे सांगितले. तत्पूर्वी शाहरुखच्या टीमनेही या व्हिडिओत काहीही तथ्य नसल्याचे स्पष्ट केले.


Web Title: stop fake news against srk hashtag trends on social media after fake news viral against the actor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.