ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 17 - अभिनेता संजय दत्त सध्या त्याच्या बायोपिकमुळे बराच चर्चेत आहेत. राजकुमार हिरानी दिग्दर्शित या सिनेमामध्ये संजयची भूमिका चॉकलेट बॉय रणबीर कपूर साकारत आहे. संजय दत्तच्या बायोपिकमध्ये सोनम कपूर धक-धक गर्ल माधुरी दीक्षितच्या भूमिकेत दिसणार असल्याची माहिती आहे.  यानिमित्तानं 10 वर्षांनंतर रणबीर आणि सोनम पुन्हा सिल्व्हर स्क्रीन शेअर करत आहेत.  
 
 
 
 
 
 
संजय दत्तच्या बायोपिकमध्ये सोनम माधुरी दीक्षित साकारणार असल्याची जरी चर्चा असली तरी काही दिवसांपूर्वी माधुरीने संजयला फोन करून तिचा उल्लेख वगळण्याची विनंती केल्याचे बोलले जात होते.  संजय आणि माधुरीचे ब्रेकअप होऊन 25 वर्षांपेक्षा अधिक काळ लोटला आहे. त्यामुळे या जुन्या आठवणी उगळण्यात काय अर्थ आहे, असे माधुरीचे म्हणणे असल्याचे म्हटले जात होते.
 
 
दरम्यान,  संजूबाबासोबत 'परिणीता' आणि 'लगे रहो मुन्नाभाई' या सिनेमांमध्ये सहकलाकार म्हणून काम केलेली अभिनेत्री दिया मिर्झा त्याची धर्मपत्नी 'मान्यता'ची भूमिका साकारणार आहे. 
 
दिल से, खामोशी आणि बॉम्बेसारख्या हिट सिनेमे देणारी सुप्रसिद्ध अभिनेत्री मनिषा कोईराला या सिनेमाद्वारे कमबॅक करत असून ती संजूबाबाची आई नरगिस म्हणून दिसेल.  
 
 
अभिनेते परेश रावल हे संजय दत्तचे वडील सुनील दत्त म्हणून मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.