सिद्धार्थ छोट्या पडद्यावर अनेक कार्यक्रमांत झळकला असला, तरी कॅमेऱ्यासमोर येण्याची त्याची पत्नी तृप्तीची ही पहिलीच वेळ होती; पण तरीही तृप्तीने सिद्धार्थला चांगलीच साथ दिली. त्यांचा ‘नच बलिये’मधील पहिला परफॉर्मन्स तर परीक्षक आणि प्रेक्षकांना प्रचंड आवडला होता; पण परीक्षकांचे गुण आणि प्रेक्षकांची मते कमी मिळाल्यामुळे त्यांना प्रेक्षकांचा निरोप घ्यावा लागला. सिद्धार्थ आणि तृप्ती यांनी या कार्यक्रमातील पहिल्या भागात अतिशय चांगला परफॉर्मन्स सादर करून ते चांगले नर्तक असल्याचेदेखील सिद्ध केले होते. या कार्यक्रमाद्वारे प्रेक्षकांना तृप्ती आणि सिद्धार्थची केमिस्ट्री अनुभवायला मिळाली होती. ‘नच बलिये’ या कार्यक्रमाचे पहिल्या सीझनचे विजेते सचिन पिळगावकर आणि सुप्रिया पिळगावकर ठरले होते. तर गेल्या सीझनमध्ये अमृता खानविलकर आणि हिमांशू मल्होत्राने नच बलियेचे विजेतेपद मिळवले होते. त्यामुळे यंदादेखील सिद्धार्थ आणि तृप्ती ही मराठमोळी जोडी प्रेक्षकांचे मन जिंकेल आणि विजेते ठरतील असेच सगळ्यांना वाटत होते.