ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 20 - बॉलिवूडचा किंग शाहरुख खाननं दिग्दर्शक इम्तियाज अलीचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. इम्तियाज अलीचा हा फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरलही झाला आहे. या फोटोमध्ये इम्तियाज सायकल चालवताना दिसत आहे. 'दिग्दर्शक इम्तियाज अलीसोबत रात्री उशीरापर्यंतची चर्चा. यावेळी तो म्हणाला, आज कल मै सिर्फ हायवेपर तमाशा करता हू',असे कॅप्शन शाहरुखने फोटो शेअर करताना  दिले आहे.
दरम्यान,  हायवे, लव आजकल आणि तमाशा या तिन्ही सिनेमांचं दिग्दर्शन इम्तियाज अलीनंच केले आहे. शाहरुखनं शेअर केलेल्या फोटोमध्ये इम्तियाज अली अंधारात सायकल चालवताना दिसत आहे. तर शाहरुख इम्तियाजच्या पाठीमागून चालत आहे. सध्या शाहरुख आणि इम्तियाज अली आगामी सिनेमा 'द रिंग'च्या शुटिंगमध्ये व्यस्त आहेत. या सिनेमात शाहरुखसोबत फिल्लौरी गर्ल अनुष्का शर्माही दिसणार आहे. या सिनेमाच्या निमित्ताने अनुष्का आणि शाहरुख तिस-यांदा पुन्हा सिल्व्हर स्क्रिन शेअर करत आहेत.  याआधी 'रब ने बना दी जोडी' आणि 'जब तक है जान' दोघांनी एकत्र काम केले आहे.