सवाई एकांकिका : 'आय अ‍ॅग्री' म्हणत होतोय तुमचा घात...

By प्रसाद लाड | Published: January 30, 2019 05:27 PM2019-01-30T17:27:38+5:302019-01-30T17:30:02+5:30

तुम्ही तंत्रज्ञानाच्या आहारी जाऊन बुद्धी कशी गहाण ठेवता, याचा उत्तम वस्तुपाठ या एकांकिकेमधून दाखवण्यात आला होता.

Sawai Ekanika: if you said 'I Agree' then any thing can happen | सवाई एकांकिका : 'आय अ‍ॅग्री' म्हणत होतोय तुमचा घात...

सवाई एकांकिका : 'आय अ‍ॅग्री' म्हणत होतोय तुमचा घात...

googlenewsNext

मुंबई : सध्याचे जग हे इंटरनेटचे आहे. एक काळ असा होता की, संगणक दिसायचे नाहीत. पण आता प्रत्येकाच्या हातामध्ये संगणकरुपी मोबाईल आला आहे. प्रत्येक दिवसाला अनलिमिटेड इंटरनेट तुम्हाला वापरायला मिळते. त्यामुळे कोणतेही अ‍ॅप तुम्ही सहजपणे डाऊनलोड करू शकता. हे अ‍ॅप आवडले नाही किंवा गरज नसेल तर डिलीटही करू शकता आणि जेव्हा गरज लागेल तेव्हा पुन्हा डाऊनलोड करू शकता. अ‍ॅप डाऊनलोड करताना काही प्रश्न विचारले जातात आणि सवयीप्रमाणे आपण 'आय अ‍ॅग्री'वर क्लिक करतो. आपण 'आय अ‍ॅग्री'वर क्लिक करण्यात एवढे सरावलो असतो की, दुसरा ऑप्शन आहे की नाही हेच पाहत नाही. पण हेच 'आय अ‍ॅग्री' किती महागात पडू शकतं, हे सांगणारी ही पुण्याच्या 'आमचे आम्ही' या संस्थेची एकांकिका होती.

एकांकिकेचं लिखाण साध, सरळ, लोकांना भावेल असं होतं. त्याचबरोबर चांगले धक्कातंत्रही वापरण्यात आले होते. तंत्रज्ञान तुमचे आयुष्य कसे उधळून लावू शकते. तुम्ही तंत्रज्ञानाच्या आहारी जाऊन बुद्धी कशी गहाण ठेवता, याचा उत्तम वस्तुपाठ या एकांकिकेमधून दाखवण्यात आला होता.



एक सुसंस्कारी घरातली ही गोष्ट. मुलगा आणि सून परदेशात कामाला. आई निवृत्त मुख्याध्यापिका. मुलगा आणि सून नुकतेच मुंबईत घरी आलेले असतात. हॉटेलमधून जेवणाची ऑर्डर करतात. ऑर्डर घेऊन जो हरी नावाचा डिलिव्हरी बॉय येतो आणि एकांकिका रंगत जाते. मोबाईलवरून ऑर्डर केल्यावर डिलिव्हरी बॉय त्यांना ब्लॅकमेल करायला लागतो. सरतेशेवटी तो आपण हे सर्व कसे केले हे सांगतो आणि ओळखही सांगतो. एकंदरीत हे इंटरनेट, अ‍ॅप्स, गेम्स आणि सोशल मीडियावरचा वावर आपल्याला कसा गोत्यात आणू शकतो, यावर एकांकिकेने प्रकाशझोत टाकला होता. ही एकांकिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. प्रेक्षक पारितोषिक त्यांनी पटकावले, पण परिक्षकांकडून या एकांकिकेला एकही पारितोषिक मिळवता आले नाही.

Web Title: Sawai Ekanika: if you said 'I Agree' then any thing can happen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे