सलमानच्या अभिनेत्रीकडे उपचारालाही नव्हते पैसे, 'हा' सुपरस्टार आला धावून!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2018 03:20 PM2018-03-22T15:20:29+5:302018-03-22T15:21:09+5:30

सलमान खानने मदत करण्यापूर्वीच तिच्या मदतीला सुपरस्टार धावून आला.

Salman's actress did not even get treatment, 'Ha' came superstar! | सलमानच्या अभिनेत्रीकडे उपचारालाही नव्हते पैसे, 'हा' सुपरस्टार आला धावून!

सलमानच्या अभिनेत्रीकडे उपचारालाही नव्हते पैसे, 'हा' सुपरस्टार आला धावून!

मुंबई - बॉलीवूडचा सुपरस्टार अभिनेता सलमान खानसोबत काम करणारी अभिनेत्री पूजा डडवाल गंभीर आजारी आहे. गेल्या 15 दिवसांपासून पूजा डडवाल रुग्णालयात उपचार घेत होती. कुटुंबीयांनी पूजा आजारी पडल्यानंतर  तिचा पती आणि घरच्या लोकांनी तिला एकटे सोडले आहे. चांगले उपचार होत नसल्यामुळे तिची तब्येत वरचेवर बिघडत चालली होती. पूजाकडे उपचारासाठी पैसेही नव्हते.  तिने मदतीसाठी सलमान खानशी संपर्क साधण्याचा प्रयत्नही केला.  मात्र, अद्याप तिचे बोलणे होऊ शकलेले नाही. पूजा आणि सलमान खान यांनी ‘वीरगती’ चित्रपटात एकत्र काम केलं आहे.  

दरम्यान, पूजाचा व्हिडिओ माध्यमातून प्रसिद्ध झाल्यानंतर आता सलमान मदत करेल, अशी आशा पूजाला होती. मात्र सलमान खानने मदत करण्यापूर्वीच तिच्या मदतीला सुपरस्टार रवी किशन धावून आला. त्यानं पूजाला आर्थिक मदत केली आहे. रवी किशनने त्याच्या जवळील पप्पू यादवला रोख पैसे आणि काही फळे देऊन रुग्णालयात पाठवलं आहे. पप्पू यादवच्या फेसबूक पोस्टवरुन पूजा रुग्णालयाच्या जनरल वॉर्डमध्ये उपचार घेत असल्याचे समोर आलं आहे. या मदतीबद्दल रवी किशन यांना विचारण्यात आलं असता तो म्हणाला की, मी आणि पूजाने  विनय लाड यांच्या चित्रपटात एकत्र काम केलं आहे. आपल्या सहकाऱ्याची मदत करण्यात गैर काय असाही प्रश्न यावेळी त्याने उपस्थित केला. 

सूत्रांनुसार, पूजाला गेल्या सहा महिन्यांपासून टीबी झाला आहे. मुबईच्या शिवडी टीबी हॉस्पिटलमध्ये दाखल आहे. तिला टीबी आणि फुप्फुसांचा आजार झाला आहे. 

पूजा डडवालने ‘वीरगती’मध्ये सलमानसोबत काम केले आहे. शिवाय ‘हिन्दुस्तान’ आणि ‘सिन्दूर की सौगंध’सारख्या चित्रपटांतूनही ती चमकली होती.

Web Title: Salman's actress did not even get treatment, 'Ha' came superstar!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.