रितेश देशमुख गेल्या काही दिवसांपासून आपल्याला नव्या लूकमध्ये पाहायला मिळत आहे. त्याचा हा लूक ‘बँजो’ या चित्रपटासाठी आहे असे अनेकांना वाटत होते. ‘बँजो’ या चित्रपटासाठी त्याने केस वाढवले होते. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर, तो आपल्या मूळ रूपात परतेल, अशी त्याच्या फॅन्सची इच्छा होती, पण या चित्रपटाच्या प्रदर्शनानंतरही तो याच लूकमध्ये वावरताना दिसतो आहे. रितेशने त्याचा हा लूक त्याच्या आगामी चित्रपटासाठी केला असल्याचे कळतेय. ‘छत्रपती शिवाजी महाराज’ या चित्रपटात रितेश शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार आहे. या भूमिकेसाठी त्याचा हा नवा लूक असल्याचे कळतेय, तसेच ‘माऊली’ या मराठी चित्रपटातही तो काम करणार आहे, पण या चित्रपटात त्याचा लूक काय असणार, याबाबत अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आला नसल्याचे कळतेय.


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.