Priya Warrior Instagram, who gets angry with the youth, gets a post of 8 lakhs | तरुणाईला वेड लावणारी प्रिया वारियर इंस्टाग्रामवर सुसाट, एका पोस्टचे मिळतात 8 लाख 
तरुणाईला वेड लावणारी प्रिया वारियर इंस्टाग्रामवर सुसाट, एका पोस्टचे मिळतात 8 लाख 

मुंबई - काही सेकंदांच्या व्हिडीओमुळे देशभरात चर्चेचा विषय ठरलेल्या प्रिया प्रकाश वारियरला तिच्या इंस्टाग्रामवरील एका पोस्टसाठी तब्बल 8 लाख रुपये मिळतात अशी माहिती समोर आली आहे.  मल्याळम सिनेमा 'ओरू अडार लव'मधून प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या प्रियाच्या सिनेमातील गाण्याच्या एका छोट्याशा क्लिपमुळे ती रातोरात स्टार झाली होती. 

दिवसेंदिवस प्रियाच्या चाहत्यांची संख्या वाढतच आहे. प्रिया वारियर हे देशातील कदाचित एकमेव असं व्यक्तिमत्व आहे जी अवघ्या 30 सेकंदांच्या एका व्हिडीओमुळे देशातील तरूणांच्या हृदयाची धडकन बनली. या व्हिडिओनंतर प्रिया प्रकाशच्या इंस्टाग्रामवर एका दिवसात 50 लाखांपेक्षा आधिक फॉलोअर्स वाढले होते. प्रियाने नुकतंच इंस्टाग्राम अकाउंटवरून एका ब्रँड्सचं प्रमोशन केलंय. यासाठी तिला एका पोस्टसाठी तब्बल 8 लाख रुपये मिळाले असल्याचे वृत्त आहे. अनेक मोठमोठे बँड्स जाहिरातीचा प्रस्ताव घेऊन तिच्याकडे जात आहेत. सोशल मीडियातून कमाई करणाऱ्या अनेक सेलिब्रेटीजलाही प्रिया प्रकाशने मागे टाकले आहे. 

दरम्यान, प्रिया प्रकाश वॉरियरने तरुणांना किती 'याड' लावलंय, हे गुगल सर्चच्या आकड्यांवरून स्पष्ट होतं. गुगल सर्चमध्ये तिने सनी लिओनीला मागे टाकलं आहे. फक्त सनीच नाही तर दीपिका पदुकोन, कतरिना कैफ आणि आलिया भट्ट यांनाही प्रिया टक्कर देत आहे. 


Web Title: Priya Warrior Instagram, who gets angry with the youth, gets a post of 8 lakhs
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.