Priya Prakash Warrior increased prices! | प्रिया प्रकाश वारियरचे वाढले भाव!
प्रिया प्रकाश वारियरचे वाढले भाव!

प्रि या प्रकाश वारियर पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. आपल्या विंक स्टाईलसाठी ओळखल्या जाणाऱ्या प्रियाने एका नॅशनल अ‍ॅड कमर्शिअल शूटसाठी १ कोटी रूपयांची डिल साईन केली असल्याची खबर आहे. काही दिवसांपूर्वी प्रिया प्रकाश मुंबईतील एका स्टुडिओत दिसली होती. त्यामागे हेच कारण होते. सूत्रांनी सांगितले की, अलीकडेच प्रियाने एका कमर्शिअलचे शूट केले. या शूटबद्दल बरीच गोपनियता बाळगली गेली. कारण ही एक नॅशनल अ‍ॅड होती. या नॅशनल अ‍ॅडसाठी प्रिया प्रकाशने १ कोटी रूपये घेतल्याचे आम्हाला सांगण्यात आले. कुठल्याही न्यूकमरसाठी ही रक्कम बरीच मोठी म्हणता येईल. यापूर्वी आपल्या इन्स्टाग्रामवरील प्रत्येक प्रमोशनल पोस्टसाठी प्रिया प्रकाश ८ लाख रुपये घेते, अशी खबर होती. इन्स्टाग्रामवर प्रिया प्रकाशचे ६० लाखांवर फॉलोअर्स आहेत. तिच्या चित्रपटांबद्दल बोलायचे तर प्रियाने दोन बॉलिवूड चित्रपट साईन केल्याचे कानावर येतेय.


Web Title:  Priya Prakash Warrior increased prices!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.