गश्मीर महाजनीने मराठी चित्रपटसृष्टीत २०१५ ला रिलीज झालेल्या ‘कॅरी आॅन मराठा’ सिनेमातून पाऊल ठेवलं. गेल्या दोन वर्षांत त्याचे चार मराठी सिनेमे रिलीज झाले आहेत आणि आता लवकरच महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘रुबिक्स क्यूब’ आणि समीर विव्दंस दिग्दर्शित आगामी चित्रपट यावर्षी रिलीज होणार आहेत. अमोल शेटगे दिग्दर्शित ‘वन वे तिकीट’ चित्रपटासाठी गश्मीर महाजनीने इटली, स्पेन आणि फ्रान्स देशांसह इतर देशांमध्ये चित्रीकरण केले आहे. तर ‘रुबिक्स क्यूब’ स्लोव्हेनिया, इटली आणि स्वित्झर्लंड येथे चित्रीत केला आहे. सूत्रांच्या अनुसार, दोन्ही चित्रपटांसाठी गश्मीर महाजनी प्रत्येक देशात किमान आठ दिवस राहून आला आहे. करिअरला आत्ताच सुरुवात झाली असताना, दोन वर्षांमध्ये पाच देशांमध्ये जाऊन शूटिंग केलेला तो एकमेव मराठी कलाकार ठरला आहे.