संगीतकार बप्पी लहरी यांचं सोन्यावर इतकं प्रेम का?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2018 05:49 PM2018-06-19T17:49:31+5:302018-06-19T17:50:39+5:30

सोन्याचे दागिने घालण्याची क्रेझ असलेले कितीतरी लोक तुम्ही पाहिले असतील. त्यातील काही जरा जास्तच लक्षात राहतात. सोन्याची आवड असणारे काही कलाकारही आहेत.

Musician Bappi Lahiri has so much love on gold? | संगीतकार बप्पी लहरी यांचं सोन्यावर इतकं प्रेम का?

संगीतकार बप्पी लहरी यांचं सोन्यावर इतकं प्रेम का?

googlenewsNext

मुंबई : सोन्याचे दागिने घालण्याची क्रेझ असलेले कितीतरी लोक तुम्ही पाहिले असतील. त्यातील काही जरा जास्तच लक्षात राहतात. सोन्याची आवड असणारे काही कलाकारही आहेत. पण त्यात जर कोणतं नाव सर्वातआधी समोर येत असेल तर ते आहे संगीतकार बप्पी लहरी. त्यांना सोनं इतकं का आवडतं? याबाबत काही खास गोष्टी जाणून घेऊया....

1) याचं कनेक्शन Elvis Presley सोबत

(Image Credit: hindi.scoopwhoop.com)

एका मुलाखतीत बप्पी दा यांनी सांगितले होते की, 'हॉलिवूडचे प्रसिद्ध गायक Elvis Presley नेहमी सोन्याची चेन परिधान करायचे. मी त्यांचा खूप मोठा फॅन आहे आणि नेहमीच त्यांना फॉलो करत आलो आहे. असा विचार करायचो की, कधी त्यांच्या इतका मोठा स्टार झालो तर आपलीही एक वेगळी ओळख निर्माण करणार. देवाच्या कृपेने मी आज माझ्या सोन्याच्या प्रेमापोटी हे असं करत आहे'.

2) मोठेपणा नाही, त्यांच्यासाठी लकी आहे सोनं

बप्पी दा हे दररोज कमीत कमी 7 ते 8 किलो सोनं अंगावर घालतात. आणि ते घालत असलेल्या प्रत्येक सोन्याच्या दागिन्याला वेगळं महत्व असल्याचं बोललं जातं. जसे की, हरे कृष्णा हरे राम लिहिलेलं त्यांचं पेंडेंट त्यांना त्यांच्या आईने दिलं होतं. तर त्यांच्या गळ्यातील बालाजीचं लॉकेट याचं संकेत आहे की, तिरुपतीचे भगवान बालाजी त्यांच्या आवाजाचं रक्षण करतात. 

3) छोटा बप्पी दा

नोव्हेंबर 2017 मध्ये बप्पी लहरी यांच्या नातवाचाही एक फोटो चांगलाच चर्चेत आला होता. या फोटोमध्ये त्यांच्या नातवाने सोन्याचे शूज घालते होते. 

4) होळीलाही सगळीकडे 'सोनं'

2013 मध्ये होळीच्या निमित्ताने बप्पी दा यांनी एक गाणं रिलीज केलं होतं. या गाण्यात सगळीकडेच सोनं दिसत होतं. 

5) निवडणूक आयोगाने विचारले, सोना कितना सोना हैं?

एका रिपोर्टनुसार, 2014 मध्ये लोकसभी उमेदवार बप्पी दा यांनी घोषित केले होते की, त्यांच्याकडे 754 ग्रॅम सोनं आहे. याची किंमत त्यावेळी जवळपास 17,67,451 इतकी होती. तर त्यांच्या पत्नीकडे 20,74,830 रुपयांचं  967 ग्रॅम सोन्याचे दागिने आहेत. 

6) सोन्यासाठी रडलेही आहेत बप्पी दा...

चेन्नईमध्ये एका कार्यक्रमात सन्मानित करण्यात आले होते. त्यावेळी बप्पी दा यांची बालाजी चेन आणि लॉकेट चोरीला गेलं होतं. त्यावेळी त्यांना इतकं दु:खं झालं होतं की, ते त्यावेळी रडलेही होते. त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी त्यांनी बालाजी चेन आणि लॉकेटही खरेदी केलं होतं. 
 

Web Title: Musician Bappi Lahiri has so much love on gold?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.