More than 200 crores of Indians watched the film in theaters | सव्वा दोनशे कोटी भारतीयांनी पाहिले थिएटर्समध्ये चित्रपट

भारतीयांचं चित्रपट हे अनेक वर्षांपासूनचं करमणुकीचं साधन आहे. एके काळी सिंगल स्क्रीन चित्रपटगृहंच भारतात होती. ती सर्वत्र नसल्यानं टुरिंग थिएटर्सही ग्रामीण भागांत जायची. तंबूमध्ये चित्रपट दाखवले जात आणि अनेक जण त्यात ते पाहत. अलीकडील काळात मल्टीप्लेक्स आले. पण तेही बहुतांशी शहरांमध्येच आहेत. ते आल्यानं सिंगल स्क्रीन थिएटर्स बंद पडतील, असं अनेकांना वाटत होतं. तसं काही प्रमाणात शहरांमध्ये घडलं. पण सारी जुनी थिएटर्स बंद पडली नाही. आजही देशात तब्बल ६ हजार सिंगल स्क्रीन थिएटर्स सुरू आहेत. याशिवाय मल्टिप्लेक्स आहेत २१00 च्या आसपास. मल्टीप्लेक्समध्ये तिकिटांचे दर अधिक असल्यानं आजही शहरांतील अनेक जण सिंगल स्क्रीन थिएटर्समध्येच जातात. तंबू चित्रपटगृहंही पूर्णत: संपलेली नाहीत. काही राज्यांत ती आहेतच.

राजा हरिश्चंद्र हा पहिला भारतीय चित्रपट १९१३ साली प्रदर्शित झाला. त्याला १0५ वर्षे झाली. तो अर्थातच मूकपट होता. गेल्या १0५ वर्षांत खूपच बदल झाले आणि गेल्या वर्षी विविध भारतीय भाषांत तब्बल १९८६ चित्रपट प्रदर्शित झाले. त्यात सर्वाधिक अर्थातच हिंदी भाषेतील होते. भारतीयांचं चित्रपटांचं वेड अद्याप कमी झालं नसल्याचा तो एक पुरावाच.

दुसरा पुरावा म्हणजे गेल्या वर्षी चित्रपटगृहांत जाऊ न चित्रपट पाहणाºयांची संख्या होती २२0 ते २२५ कोटी. भारताची लोकसंख्या १२५ कोटींच्या आसपास आहे. म्हणजे प्रत्येकाने सरासरी दोन चित्रपट थिएटरमध्ये पाहिले असं म्हणता येईल. काही जण अजिबातच थिएटरमध्ये जात नाहीत आणि काही जण महिन्यातून दोन-तीन चित्रपट थिएटरमध्येच पाहतात.

या २२0 कोटी लोकांनी चित्रपट पाहण्यासाठी किती रक्कम मोजली, हे माहीत आहे? ती रक्कम आहे १५ हजार ५00 कोटी रुपये. याशिवाय तिथं काही तरी खायला घेतलं जातं. त्यावरील खर्च वेगळाच. पण घरीच टीव्हीवर चित्रपट पाहणाºयांचं प्रमाणही प्रचंड आहे. ते लक्षात घेतलं, तर दरवर्षी घरी वा थिएटरमध्ये चित्रपट पाहणाºयांचा आकडा ७00 ते ८00 कोटींच्या वर जाईल, असा अंदाज आहे. काहींच्या मते तर तो त्याहून खूपच अधिक असू शकेल.

बांग्लादेशात केवळ ३00 थिएटर्स आहेत, तर पाकिस्तानात ४00 च्या आसपास आहे. नेपाळमध्ये अवघी १३0 थिएटर्स आहेत. गंमत म्हणजे तिथंही भारतीय व प्रामुख्यानं हिंदी चित्रपटच मोठ्या प्रमाणात पाहिले जातात. नेपाळमध्ये भोजपुरी तर बांग्लादेशात बंगाली चित्रपटांनाही प्रचंड मागणी असते.


Web Title:  More than 200 crores of Indians watched the film in theaters
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.