देसी गर्ल प्रियंका चोप्राचं हे महागड्या गाड्यांचं कलेक्शन पाहून व्हाल थक्क

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2018 02:15 PM2018-05-26T14:15:12+5:302018-05-26T14:17:08+5:30

प्रियंकाला अनेक गोष्टींसोबतच कार्सची खूप आवड आहे. प्रियंकाकडे एकापेक्षा एक कार्सचं कलेक्शन आहे. चला जाणून घेऊया तिच्याकडे कोणकोणत्या कार आहेत...

Luxury car collection of the Actress Priyanka Chopra | देसी गर्ल प्रियंका चोप्राचं हे महागड्या गाड्यांचं कलेक्शन पाहून व्हाल थक्क

देसी गर्ल प्रियंका चोप्राचं हे महागड्या गाड्यांचं कलेक्शन पाहून व्हाल थक्क

googlenewsNext

(All Iamge Credit: www.carkhabri.com)

बॉलिवूड ते हॉलिवूडपर्यंत आपला जलवा दाखवणारी देसी गर्ल अभिनेत्री प्रियंका चोप्राचा तिच्या शानदार लाईफस्टाईलबद्दलही नेहमीच चर्चेत असते. सर्वात स्टाईलिश अभिनेत्रींमध्ये वरच्या क्रमांकात तिचं नाव आहे. प्रियंकाला अनेक गोष्टींसोबतच कार्सची खूप आवड आहे. प्रियंकाकडे एकापेक्षा एक कार्सचं कलेक्शन आहे. चला जाणून घेऊया तिच्याकडे कोणकोणत्या कार आहेत...

प्रियंकाच्या कार कलेक्शनमध्ये सर्वात महागडी रोल्स रॉयस गोस्ट आहे. या कारची किंमत 2.5 कोटी रूपये आहे. खास गोष्ट म्हणजे प्रियंका बॉलिवूडची पहिली अभिनेत्री जिच्याकडे ही कार आहे. या कारमध्ये ट्वि टर्बो 6.6 लीटर वी12 हे इंजिन आहे. ही कार 100 किलोमीटर प्रति तासाचा वेग केवळ 4.7 सेकंदात पार करते.

देसी गर्लजवळ मर्सिडीज बेंज एस क्लास सुद्धा आहे. या कारची किंमत 1.21 कोटी रूपये इतकी आहे. ही कार 4.6 सेकंदात 0 ते 100 किलोमीटर प्रति तासाचा वेग घेऊ शकते. रात्रीच्या अंधारात कोणत्याही प्रकारची दुर्घटना होऊ नये म्हणून यात नाईट व्ह्यू असिस्ट प्लस सिस्टम देण्यात आलं आहे. तसेच यात हॉट स्टोन मसाजची सुविधाही आहे.

प्रियंकाच्या चोप्राच्या गाड्यांच्या लिस्टमध्ये लग्झरी क्रॉसओवर एसयूवी ‘पोर्श कयन’ ही कार सुद्धा आहे. या कारची किंमत जवळपास 1.04 कोटी रूपये इतकी आहे. पोर्श कयन जर्मन ऑटोमेकर पोर्शची मिड-साईज लग्झरी क्रॉसओवर एसयूवी आहे.

त्यानंतर प्रियंकाच्या कलेक्शनमध्ये मर्सिडीजची ई-क्लास कार सुद्धा आहे. यात ईएसपी, एलईडी हाय परफॉर्मन्स हेडलॅम्प, प्री-सेफ, अ‍ॅक्टिव पार्किंग असिस्ट, ड्यूअल फ्रन्ट एअरबॅग देण्यात आले आहेत. डिझायनर फ्रन्ट ग्रील, ऑल एलईडी लाईट्स या कारच्या एक्सटिरीअरचा भाग आहे.

2016 मध्ये वर्ल्ड लग्झरी कारचा अवॉर्ड जिंकणा-या BMW 7 सीरीज सुद्धा प्रियंकाच्या कार कलेक्शनमध्ये आहे. BMW 7 ही केवळ बाहेरून नाहीतर आतूनही तेवढीच सुंदर आहे. BMW 7 च्या कारची खासियत म्हणजे यात मिळणारा कम्फर्ट. BMW 7 ची भारतातील किंमत 1.1 कोटी रूपयांपासून ते 1.95 कोटी रूपयांदरम्यान आहे.

प्रियंकाकडे केवळ कार्स नाहीयेत तर तिच्याकडे एक शानदार बाईकही आहे. प्रियंकाने एक गुलाबी रंगाची एक हार्ले डेविडसन ही बाईकही घेतली आहे.

Web Title: Luxury car collection of the Actress Priyanka Chopra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.