- Shama Bhagat

‘बॉलिवूडची बार्बी डॉल’ अर्थात कॅटरिना कैफ ही आज तिचा ३४ वा वाढदिवस साजरा करीत आहे. कॅटचा हा वाढदिवस तिच्यासाठी सर्वच अर्थाने स्पेशल आहे. कारण तिचा नवा चित्रपट रिलीज झाला आहे. तिच्याशी संवाद साधला असता, तिने दिलखुलासपणे प्रश्नांची उत्तरे दिली. ‘बॉलिवूडची
बार्बी डॉल’ अर्थात कॅटरिना कैफ ही आज तिचा ३४ वा वाढदिवस साजरा करीत आहे. कॅटचा हा वाढदिवस तिच्यासाठी सर्वच अर्थाने स्पेशल आहे. कारण तिचा नवा चित्रपट रिलीज झाला आहे. तिच्याशी संवाद साधला असता, तिने दिलखुलासपणे प्रश्नांची उत्तरे दिली.

प्रश्न : चित्रपटांची निवड करताना तुझ्यावर दडपण असते काय?
- चित्रपट करताना त्यामध्ये मी स्वत:ला सिद्ध करण्याचा प्रयत्न करीत असते. त्यामुळे स्वाभाविकपणे दडपण येतेच. बऱ्याचदा मी स्वत:हून काही जबाबदाऱ्या स्वीकारत असल्याने काही आव्हाने समोर उभी राहतात; मात्र या आव्हानांचा सामना करणे मला आवडते. कारण बऱ्याचशा गोष्टी असतात, ज्या एका चित्रपटाला पूर्ण करण्यासाठी गरजेच्या असतात. त्यामुळे दडपण जरी येत असले तरी, मी याकडे जबाबदारी म्हणून बघते.

प्रश्न : अनुराग बसू यांच्या दिग्दर्शनातून बऱ्याचशा गोष्टी शिकायला मिळतात, तुझा काय अनुभव सांगशील?
- इंडस्ट्रीमध्ये अनुराग अनुभवी दिग्दर्शक आहेत. ज्यांना सत्य गोष्टींमध्येच रस असतो. फेक किंवा वायफळ गोष्टी त्यांना अजिबातच आवडत नाहीत. त्यामुळे त्यांच्याकडून बऱ्याचशा गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. मलाही त्यांच्या दिग्दर्शनाखाली काम करताना काही गोष्टी शिकावयास मिळाल्या. शिवाय अनुराग एक मित्र म्हणून देखील चांगले असल्याने, त्यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव नक्कीच सुखावणारा आहे.

प्रश्न : नुकत्याच रिलीज झालेल्या चित्रपटाविषयी काय सांगशील?
-चित्रपटात मी जासूस होणं हा एक योग म्हणावा लागेल. कारण मी चित्रपटात शोधपत्रकारिता करणारी पत्रकार आहे. चित्रपटाची कथा एका मुलावर आधारित असून, तो त्याच्या वडिलांच्या शोधात असतो. चित्रपटाचा संपूर्ण प्रवास संगीतमय आहे. त्यामुळे या चित्रपटाविषयी बऱ्याचशा गोष्टी माझ्यासाठी अविस्मरणीय आहेत. मी या चित्रपटात काम करताना बऱ्याचशा गोष्टी शिकले अन् एन्जॉयही केल्या. प्रेक्षकांना जग्गा आणि श्रुतीची जोडी आवडेल, अशी अपेक्षा आहे.

प्रश्न : आयुष्याच्या तुझ्या तत्त्वांबद्दल काय सांगशील?
- आयुष्याला एका विशिष्ट पातळीवर बॅलन्स कसे ठेवता येईल, याचा प्रत्येकानेच विचार करायला हवा. मी याच तत्त्वाने आयुष्याकडे बघत असते. यासाठी तुमच्यात सकारात्मकता असायला हवी. प्रत्येक गोष्टींकडे जर तुम्ही सकारात्मक दृष्टिकोनातून बघितले तर तुम्हाला कुठलीच गोष्ट असाध्य वाटणार नाही, असे मला वाटते. कारण आपल्या अवतीभोवती बऱ्याचशा अशा गोष्टी असतात, ज्यामधून आपल्याला काही ना काही शिकावयास मिळत असते. त्याचा सगळ्यांनी लाभ घ्यायला हवा, असे मला वाटते.

प्रश्न : इंडस्ट्रीमधील न्यूकमर्सना तुझी भीती वाटते, यामागचे
नेमके वास्तव काय?
- असं काही नाही, मुळात असं कोण म्हटलं? वरुण धवन, आदित्य रॉय कपूर आणि परिणिती चोप्रा जर असे म्हणत असतील तर ते खोटं बोलत आहेत. मुळात कुठलाच कलाकार मला घाबरत नाही. मी वरुणला गेल्या १६ वर्षांपासून ओळखते. आदित्य माझा जवळचा मित्र आहे. त्यामुळे मला नाही वाटतं, की न्यूकमर्स मला घाबरत असतील. मी आता ज्या कलाकारांची नावे घेतली आहेत, ते इंडस्ट्रीमध्ये उत्कृष्ट काम करीत आहेत.