Krishna Abhishek debuts in Marathi | कृष्णा अभिषेकचे मराठीमध्ये पदार्पण

मराठी चित्रपटांना मिळणारे यश पाहता, आजकाल हिंदी कलाकारांनाही मराठीत काम करण्याची इच्छा असते. आता हेच पाहा ना, ‘कॉमेडी नाईट्स बचावो’ याशोमधून प्रेक्षकांना खळखळून हसविणारा अभिनेता कृष्णा अभिषेक हादेखील लवकरच मराठी चित्रपटात पदार्पण करणार आहे. ‘भिंगरी’ या चित्रपटातून कृष्णा मराठीत पदार्पण करतो आहे. या चित्रपटात कृष्णा अभिषेकसोबत अभिनेत्री कांचन पाहायला मिळेल. या चित्रपटाचे दिग्दर्शन मुरली ललवाणी यांनी केले आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण लवकरच सुरू होईल. तसेच, या चित्रपटाचे काही चित्रीकरण कुलुमनालीला होणार आहे.


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.