कॅटरिना कैफ हिचा ‘टायगर जिंदा है’ या चित्रपटाची अनेकांना प्रतीक्षा आहे. पण कदाचित तुम्हाला ठाऊक नसेल, ‘टायगर जिंदा है’ नंतर कॅटरिना हॉलिवूडला रवाना होणार आहे. होय, प्रियांका चोप्रा आणि दीपिका पदुकोण यांच्यापाठोपाठ कॅटरिनाही हॉलिवूडमध्ये आपले नशीब अजमावण्याच्या तयारीत आहे. खुद्द कॅटरिनानेच ही माहिती दिली आहे. आयुष्य आपल्याला कुठल्या मार्गाने घेऊन जाईल, याचा नेम नाही. मी आयुष्यात कुठल्याही संधीला ‘नाही’ म्हटलेले नाही. कदाचित उद्या मी कुठल्याशा हॉलिवूड चित्रपटातही दिसेल. मी कायम उत्तम प्रोजेक्टवर लक्ष केंद्रित केले आहे. बॉलिवूडसोबत हॉलिवूडमध्येही उत्तम प्रोजेक्टचा भाग होण्याची संधी मला मिळत असेल तर मी ही संधी निश्चितपणे घेईल, असे कॅटरिनाने म्हटले आहे. तिची ही बदललेली भाषा बघता कॅटरिना लवकरच हॉलिवूडमध्ये एन्ट्री घेणार, असा अंदाज बांधला जात आहे. तसेही गतवर्ष कॅटरिनासाठी फारसे चांगले राहिलेले नाही. बॉक्स आॅफिसने कॅटरिनाला केवळ ‘नो एन्ट्री’चा बोर्ड दाखवला. गतवर्षी तिचे सगळेच चित्रपट आपटले. आधी ‘फितूर’ व ‘बार बार देखो’ या चित्रपटांनी कॅटची पुरती निराशा केली. त्यातच रणबीर कपूरसोबत ब्रेकअप झाल्याने कॅटरिनाला मोठ्या मानसिक धक्क्यातून जावे लागले. पण कॅटरिना आता या धक्क्यातून सावरलीय आणि तिने तिचे लक्ष पुन्हा एकदा करिअरवर केंद्रित केले आहे. २कॅटरिना लवकरच ‘टायगर जिंदा है’ मध्ये दिसणार आहे. यात सलमान खान तिचा हिरो असणार आहे. सलमान व कॅटरिनाची आॅनस्क्रीन जोडी कायम हिट राहिली आहे. या जोडीचा ‘एक था टायगर’ तुफान हिट झाला होता. ‘टायगर जिंदा है’ हा याच चित्रपटाचा सीक्वल आहे. ‘टायगर जिंदा है’शिवाय कॅटरिनाचा ‘जग्गा जासूस’ हा चित्रपटही आपल्याला पाहायला मिळणार आहे. यात ती रणबीर कपूरसोबत आॅनस्क्रीन रोमान्स करताना दिसणार आहे.


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.