इथे ‘फ्लॉप’चित्रपटांवर रंगते चर्चा  

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2018 02:45 AM2018-08-13T02:45:28+5:302018-08-13T02:45:40+5:30

सध्या सोशल मीडियावर एका ग्रुपची जोरदार चर्चा आहे. आता लाखो ग्रुप आहेत, त्यातला नक्की कोणता? असा प्रश्न नक्कीच पडू शकतो. पण त्या ग्रुपच्या नावातच विषयाचा वेगळेपणा आहे.

Here's the 'flops' color scheme on the screen | इथे ‘फ्लॉप’चित्रपटांवर रंगते चर्चा  

इथे ‘फ्लॉप’चित्रपटांवर रंगते चर्चा  

googlenewsNext

- नम्रता फडणीस
पुणे - सध्या सोशल मीडियावर एका ग्रुपची जोरदार चर्चा आहे. आता लाखो ग्रुप आहेत, त्यातला नक्की कोणता? असा प्रश्न नक्कीच पडू शकतो. पण त्या ग्रुपच्या नावातच विषयाचा वेगळेपणा आहे, त्या ग्रुपचे नाव आहे ‘आय लव्ह ट्रॅशी हिंदी मुव्हीज.’ एक जमाना असा होता, की चित्रपटांमध्ये उत्तम संहितेपेक्षाही भन्नाट वेशभूषा, जबरदस्त संवादफेक अशाच अशक्यप्राय वाटणाऱ्या गोष्टींच्या भडिमारामुळे कित्येकदा प्रेक्षकांची हसूनहसून पुरेवाट व्हायची. तरीही काहीशा ‘ब’ किंवा ‘क’ वर्गात मोडणा-या या चित्रपटांनीही प्रेक्षकांचे यथेच्छ मनोरंजन केले. आजच्या जमान्यात हे चित्रपट कदाचित ‘फ्लॉप’ दर्जाचे ठरू शकतील मात्र अशा चित्रपटांच्या चाहत्या वर्गामुळेच हा ग्रुप हिट झाला असून, या ग्रुपचे जवळपास ११ हजारांच्या वर सदस्य आहेत हे ऐकून धक्का बसेल!
‘आतंक ही आतंक’, ‘दर्या दिल’, ‘जुल्म की हुकुमत’, ‘खुदा मेहेरबान तो गधा पेहेलवान’ या अशा चित्रपटांची नावे कधी ऐकली आहेत का? आठवून पाहा, कितीही डोकं खाजवलत तरी उत्तर ‘नाही’ असंच येईल.
मात्र अशा चित्रपटांवर जर तुम्ही मनापासून प्रेम करणारे असाल तर तुमचे या ग्रुपवर स्वागत आहे. आता ‘ट्रॅशी’ म्हणजे काय? हे चित्रपट ‘फ्लॉप’, ‘गलिच्छ’ की ‘भीतिदायक’ नक्की कोणत्या वर्गात मोडणारे आहेत, असा एक विचार मनात येऊ
शकतो.
खलनायकाचे भन्नाट संवाद, पांढरे बूट, टिपिकल वाक्य अशा काही विशिष्ट गोष्टी या चित्रपटांची ओळख आहे.

कुणी संवाद टाकतो, तर कोणी पोस्टर
या ग्रुपवर भारतातल्या प्रादेशिक चित्रपटांची पोस्टर टाकली जातात, कुणी एखादा चित्रपटही टाकतो, कुणी संवाद टाकतो, एखाद्या चित्रपटातला प्रसंग, तो कशा पद्धतीने सादर झाला, त्यात कशावर भर दिला गेलाय, याविषयीच्या चर्चा घडतात. विशेष म्हणजे, दोन वर्षांपासून राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे संचालक प्रकाश मगदूम हेदेखील या ग्रुपचे सक्रिय सदस्य आहेत. त्यांनीच ‘लोकमत’ला या अभिनव उपक्रम करणाºया ग्रुपची माहिती दिली.
‘आय लव्ह ट्रॅशी हिंदी मुव्हीज’ या ग्रुपशी दोन वर्षांपासून संलग्न आहे. बॉलिवूडमध्ये अनेक चित्रपटांचे डॉक्युमेंटेशन इथे पाहायला मिळते. या चित्रपटांची माहिती मिळण्याबरोबरच सदस्यांकडून सातत्याने ग्रुपवर चित्रपटांचे जे पोस्टर टाकले जातात ते सहजासहजी कुठे उपलब्ध होत नाहीत. हे चित्रपट कदाचित दर्जात्मक नसतीलही. पण चित्रपट जतनाच्या दृष्टिकोनातून त्यांचे निश्चितच महत्त्व आहे.
- प्रकाश मगदूम,
संचालक राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय

हे असे चित्रपट कदाचित बोअरिंग वाटू शकतात. या चित्रपटांमधून काही अभिनेत्यांवर अयशस्विततेचा ठपका बसला असला तरी या चित्रपटांमध्ये काम करणे हे धाडसीपणाचे आहे.
या चित्रपटांचे स्मरण करून कुणा व्यक्तीची खिल्ली उडविण्याचा हेतू नाही तर असेही चित्रपट होऊन गेले ज्यातून ख-या अर्थाने हसण्यातून मनोरंजन झाले पण त्यांच्यावर ‘फ्लॉप’ चा ठपका बसला.
इतकाच या ग्रृपनिर्मितीचा हेतू असल्याचे सुरूवातीलाच अँडमिनकडून स्टेटसमध्ये नमूद करण्यात आले
आहे. या ग्रृपने दहा हजार सदस्यांचा टप्पा पार केल्यामुळे या चित्रपटांचा देखील एक चाहता वर्ग आहे हे यातून स्पष्ट होते.

Web Title: Here's the 'flops' color scheme on the screen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :cinemaसिनेमा