बर्थडे स्पेशल: जेव्हा एका किसमुळे शिल्पा विरुद्ध निघालं होतं अटक वॉरंट

By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2018 11:52 AM2018-06-08T11:52:51+5:302018-06-08T12:00:00+5:30

शिल्पाचा जन्म 1975 मध्ये मॅंगलोर कर्नाटकमध्ये झाला होता. 25 वर्षांआधी बाजीगर या सिनेमातून तिने आपल्या बॉलिवूड करीअरला सुरुवात केली होती.

Happy Birthday Shilpa Shetty : lesser known facts and controversy | बर्थडे स्पेशल: जेव्हा एका किसमुळे शिल्पा विरुद्ध निघालं होतं अटक वॉरंट

बर्थडे स्पेशल: जेव्हा एका किसमुळे शिल्पा विरुद्ध निघालं होतं अटक वॉरंट

मुंबई : बॉलिवूडमध्ये दोन दशकांपेक्षा जास्त आपल्या अदाकारीने प्रेक्षकांचं मनोरंजन करणाऱ्या अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा आज वाढदिवस आहे. शिल्पाचा जन्म 1975 मध्ये मॅंगलोर कर्नाटकमध्ये झाला होता. 25 वर्षांआधी बाजीगर या सिनेमातून तिने आपल्या बॉलिवूड करीअरला सुरुवात केली होती. त्यानंतर तिने 40 सिनेमांमध्ये काम करत आपली जादू चालवली. चला जाणून घेऊया शिल्पाच्या प्रवासाबाबत.....

शिल्पा शेट्टीचा जन्म जरी कर्नाटकात झाला असला तरी तिचं बालपण मुंबईतच गेलं आहे. शिल्पाने चेंबूरच्या एंथनी गर्ल्स हायस्कूलमधून शालेय शिक्षण घेतलं आणि पुढील शिक्षण पोद्दार कॉलेजमधून केलं. शिल्पा ही भरतनाट्यमही करते. त्यासोबतच ती कॉलेजमध्ये वॉलीबॉल टीमची कॅप्टनही राहिली आहे आणि कराटेमध्ये ब्लॅक बेल्टही आहे. 

शिल्पा ही नेहमीच आपल्या बोल्ड अवतारासाठी ओळखली जाते. आज एका मुलाची आई असूनही ती फिटनेसबाबत लोकांना धडे देऊ शकते इतकी फिट आहे. 1994 मध्ये आलेला आग हा सिनेमा शिल्पाचा पहिला सिनेमा होता. पण हा बाजीगरनंतर रिलीज झाला. 

शिल्पा जितकी आपल्या भूमिकांमुळे चर्चेत होती तितकीच ती तिच्या पर्सनल लाइफमधील वादांमुळेही चर्चेत राहिली. शिल्पाची सर्वात जास्त चर्चा ही अक्षय कुमारच्या रिलेशनशिपमुळे झाली होती. असे सांगितले जाते की, या दोघांचं नातं मै खिलाडी तू अनाडी या सिनेमापासून सुरु झालं होतं. पण दोघे वेगळे झाले. त्यानंतर शिल्पाने अक्षयवर फसवणूक केल्याचाही आरोप लावला होता. 

शिल्पा आणि अक्षयचं अफेअप अनेक वर्ष सुरु होतं. धडकन सिनेमावेळी दोघांचं ब्रेकअप झालं. एका मुलाखतीत शिल्पाने सांगितले होते अक्षयने तिची फसवणूक केली आहे. शिल्पा ही अक्षयवर खूप प्रेम करायची पण त्याने दगा दिल्यावर ती एकटी पडली. त्याचं तिला फार दु:खं झालं होतं. 

अक्षय कुमारनंतर शिल्पा हॉलिवूड अभिनेता रिचर्ड गेअरसोबतच्या किसमुळे वादात सापडली होती. 2007 मध्ये दिल्लीतील एका कार्यक्रमात रिचर्डने शिल्पाला भर स्टेडवर सर्वांसमोर किस केलं होतं. त्यामुळेही चांगलंच वादळ उठलं होतं. या वादामुळे शिल्पाला कोर्टात खेचलं गेलं होतं. 

शिल्पा सध्या सिनेमात काम करत नसली तरी रिअॅलिटी शोमध्ये परिक्षक म्हणून दिसत असते. त्यासोबतच ती एक फिटनेस ट्रेनर म्हणूनही लोकप्रिय आहे.
 

Web Title: Happy Birthday Shilpa Shetty : lesser known facts and controversy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.