HAPPY BIRTHDAY :शाहिद कपूरच्या खास गोष्टी

By Admin | Published: February 25, 2017 11:33 AM2017-02-25T11:33:41+5:302017-02-25T11:45:19+5:30

बॉलिवूडचा चॉकलेट बॉय शाहिद कपूरचा आज 36 वा वाढदिवस आहे.

HAPPY BIRTHDAY: Shahid Kapoor's specials | HAPPY BIRTHDAY :शाहिद कपूरच्या खास गोष्टी

HAPPY BIRTHDAY :शाहिद कपूरच्या खास गोष्टी

googlenewsNext

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 25 - बॉलिवूडचा चॉकलेट बॉय शाहिद कपूरचा आज 36 वा वाढदिवस आहे. इंडस्ट्रीमध्ये शाहिदला 'शाशा' देखील म्हटले जाते.  25 फेब्रुवारी 1981रोजी शाहिद कपूरचा मुंबईत पंजाबी कुटुंबात जन्म झाला. बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेता आणि दिग्दर्शक पंकज कपूर आणि अभिनेत्री व शास्त्रीय नर्तिका नीलिमा हे शाहिद कपूरचे आईवडील.  
 
शाहिदने लहान असतानाच अभिनय क्षेत्रात पर्दापण केले होते. एक उत्कृष्ट अभिनेत्याशिवाय तो उत्तम डान्सरदेखील आहे. 
 
वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया त्याच्याबद्दलच्या काही गोष्टी
शाहिद 3 वर्षांचा असताना त्याचे आईवडील वेगळे झाले होते. यानंतर तो आपल्या आईसोबत दिल्लीत आजी-आजोबांसोबत राहू लागला. मोठा झाल्यानंतर त्याने मुंबईवापसी केली.  मुंबापुरीत आल्यानंतर तो कोरिओग्राफर शामक दावरच्या डान्स अकॅडमीत सहभागी झाला. 
 
90 च्या दशकात शाहिदने काही सिनेमांमध्ये बॅकग्राऊंड डान्सर म्हणून काम केले. त्यानंतर तो म्युझिक व्हिडीओंसहीत काही जाहिरातींमध्येही झळकला. शाहरुख खान, काजल आणि राणी मुखर्जीसोबत केलेली 'पेप्सी'ची त्याची पहिली जाहिरात. यानंतर तो किट-कॅट, ओनिडा टीव्ही वगैरेसारख्या ब्रँडच्या जाहिरातींमध्ये दिसला होता.  
 
सुभाष घई यांनी शाहिदला डान्स करताना पाहिले आणि त्याचा डान्स आवडल्यानंतर त्यांनी 'ताल'मध्ये या आपल्या सिनेमात शाहिदला बॅकग्राऊंड डान्सर म्हणून घेतले.  ‘कहीं आग लगे लग जावे’ या गाण्यात शाहिदने अभिनेत्री ऐश्वर्या रायसोबत डान्स केला. 
 
यानंतर 2003 मध्ये आलेला रोमँटिक कॉमेडी ‘इश्क विश्क’ सिनेमातून शाहिदनं ख-या अर्थानं बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली. हा सिनेमा सुपरहिट ठरला.  या सिनेमासाठी शाहिदला फिल्मफेअरच्या 'बेस्ट मेल डेब्यू' अवॉर्डने गौरवण्यातही आले.  
2005 मध्ये शाहिद कपूर, करीना कपूर आणि फरदीन खानचा 'फिदा' हा सिनेमा आला होता.
 
या सिनेमाच्या निमित्ताने करीना आणि शाहिद एकमेकांच्या जवळ आले.  2006 मध्ये आलेल्या सुरज बडजात्या यांच्या 'विवाह' सिनेमातील 'प्रेम' या भूमिकेमुळे शाहिदला आणखी लोकप्रियता मिळाली. या सिनेमामुळे शाहिदची वेगळीच प्रतिमा चाहत्यांमध्ये निर्माण झाली.  
 
2007 मधील शाहिद आणि करीनाचा 'जब वी मेट' सिनेमाला सिनेरसिकांनी भरभरुन प्रेम दिलं. हा सिनेमा सुपर-डुपर हिट ठरला. मात्र, या वर्षी शाहिद आणि करीना यांच्या नात्यात कटुता आली आणि दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला.  
2008 मध्ये विशाल भारद्वाज यांच्या 'कमीने' सिनेमाने शाहिदची इंडस्ट्रीमधील इमेज बदलली. हा सिनेमा सुपरहिट ठरला आणि सिनेमाला अवॉर्डसही मिळाले. यामध्ये शाहिदने डबल रोल साकारला होता.  
 
करीना कपूरसोबतचे नाते संपुष्टात आल्यानंतर शाहिदेन मीरा राजपूतसोबत 2015मध्ये लग्न केले आणि ऑगस्ट 2016मध्ये त्यांनी एका गोंडस मुलीला जन्म दिला. शाहिद आणि मीरा या नावाहून त्यांनी आपल्या मुलीचे नाव मीशा असे ठेवले.  
शाहिदने आतापर्यंत जवळपास 70-80 सिनेमांमध्ये काम केले आहे. यातील बरेच सिनेमे हिटदेखील झाले आहेत. 
 

Web Title: HAPPY BIRTHDAY: Shahid Kapoor's specials

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.