Happy Birthday Kajal Aggarwal : काजल अग्रवालला 'या' अभिनेत्याने जबरदस्तीने केलं होतं किस!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2018 11:41 AM2018-06-19T11:41:33+5:302018-06-19T11:47:04+5:30

काजल आज साऊथ सिने इंडस्ट्रीमध्ये टॉपच्या अभिनेत्रींमध्ये गणली जाते. चला जाणून घेऊ तिच्या काही खास गोष्टी...

Happy Birthday Kajal Aggarwal : Intresting facts about Actress Kajal | Happy Birthday Kajal Aggarwal : काजल अग्रवालला 'या' अभिनेत्याने जबरदस्तीने केलं होतं किस!

Happy Birthday Kajal Aggarwal : काजल अग्रवालला 'या' अभिनेत्याने जबरदस्तीने केलं होतं किस!

googlenewsNext

मुंबई : 'सिंघम' सिनेमातून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री काजल अग्रवालचा आज वाढदिवस. काजला जन्स 19 जून 1985 मध्ये एका पंजाबी परिवारात झाला. काजल आज साऊथ सिने इंडस्ट्रीमध्ये टॉपच्या अभिनेत्रींमध्ये गणली जाते. चला जाणून घेऊ तिच्या काही खास गोष्टी...

काजल अग्रवालने आतापर्यंत तमिळ, तेलगु, मल्याळम आणि हिंदी सिनेमात कामे केली आहेत. फार कमी लोकांना माहीत असेल की, काजल ही मुंबईची असून इथेच ती लहानाची मोठी झाली. तिचं शिक्षण मुंबईतील केसी कॉलेजमधून झालं. या कॉलेजमधून तिने मास मीडियामध्ये ग्रॅज्यूएशन केलं. त्यानंतर तिने मॉडेलिंगकडे आपला मोर्चा वळवला. 

कॉलेजपासून मॉडेलिंग

कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला पोहेपर्यंत तिने मॉडेलिंग सुरु केली होती. तिने बॉलिवूडमध्ये 'क्यो हो गया ना' या सिनेमातून डेब्यू केलं होतं. या सिनेमात ती दीया मिर्झाची मैत्रिण दाखवण्यात आली होतीय त्यानंतर तिने कल्याण रामसोबत लक्ष्मी कल्याणम या तेलगु सिनेमातून साऊथमध्ये डेब्यू केलं होतं. 

टॉपलेस फोटोशूट

काजलचे अनेक वादही चर्चेत राहिले. 2014 मध्ये तिने एका मॅगझिनसाठी टॉपलेस फोटोशूट केलं होतं. पण तिने हे कधीही मान्य केलं नाही. तिने दावा केला होता की, तिच्या फोटोसोबत छेडखानी करण्यात आली होती. 

जबरदस्तीने किस

'दो लफ्जो की कहानी' या बॉलिवूड सिनेमातील काजल आणि रणदीप हुड्डाचा लिपलॉक सीन चांगलाच गाजला होता. असे सांगितले जाते की, काजलला आधी माहीत नव्हतं आणि अचानक रणदीपने येऊन तिला किस केलं. यामुळे काजल चांगलीच नाराज झाली होती. 

किती घेते एका सिनेमासाठी पैसे?

काजल आज साऊथ सिने इंडस्ट्रीतील एक मोठं नाव आहे. जवळपास सगळ्याच मोठ्या अभिनेत्यांसोबत तिने काम केलं आहे. आज ती एका सिनेमासाठी 2 कोटी रुपये मानधन घेते. 
 

Web Title: Happy Birthday Kajal Aggarwal : Intresting facts about Actress Kajal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.