"हसीना" श्रद्धा कपूरमुळे 22 वर्षात पहिल्यांदाच DDLJ चा शो रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2017 05:51 PM2017-07-19T17:51:17+5:302017-07-19T17:51:36+5:30

मराठा मंदिर चित्रपटगृहात 22 वर्ष नियमितपणे प्रेक्षकांचे मनोरंजन करुन सिनेमाचा ट्रेंड बदलणाऱ्या डीडीएलजे अर्थात दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे या चित्रपटाचा शो रद्द करण्याची पहिल्यांदाच वेळ आली.

For the first time DDLJ's show canceled in 22 years due to "Hasina" Shraddha Kapoor | "हसीना" श्रद्धा कपूरमुळे 22 वर्षात पहिल्यांदाच DDLJ चा शो रद्द

"हसीना" श्रद्धा कपूरमुळे 22 वर्षात पहिल्यांदाच DDLJ चा शो रद्द

googlenewsNext

tyle="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 19 - मुंबईतील मराठा मंदिर चित्रपटगृहात 22 वर्ष नियमितपणे प्रेक्षकांचे मनोरंजन करुन सिनेमाचा ट्रेंड बदलणाऱ्या डीडीएलजे अर्थात दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे या चित्रपटाचा शो रद्द करण्याची पहिल्यांदाच वेळ आली. 22 वर्षात एकदाही या चित्रपटाचा मॅटिनी शो रद्द करण्याची वेळ आली नव्हती. मात्र काल मंगळवारी श्रद्धा कपूरची मुख्य भूमिका असलेल्या हसीना पारकर या चित्रपटाच्या ट्रेलरच्या स्क्रीनिंगसाठी डीडीएलजेचा खेळ रद्द करण्यात आला.
हसीना पारकर डोंगरीची रहिवासी असल्यामुळे त्याच्या जवळ असलेल्या मराठा मंदिर चित्रपटगृहात ट्रेलर रिलीज करण्याची सिनेमाच्या दिग्दर्शकाची इच्छा होती, असं मराठा मंदिरचे कार्यकारी संचालक मनोज देसाई यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं. क्वीन ऑफ मुंबई अशी ख्याती असलेली गँगस्टर दाऊद इब्राहिमची बहीण हसीना पारकरच्या आयुष्यावर हा चित्रपट आधारित आहे.
डीडीएलजे चित्रपटावर कोणताही अन्याय झालेला नाही. हसीना पारकरच्या निर्मात्यांनी हाऊसफुल शोसाठी लागणारी रक्कम देण्याचा प्रस्ताव मांडला. तो मी डीडीएलजेचे निर्मात्यापर्यंत पोहचवला. त्यांच्या संमतीनेच हा ट्रेलर लाँचचा कार्यक्रम झाला असं देसाईंनी स्पष्ट केलं. मॅटिनी शोचं तिकीट 15 ते 20 रुपये इतकं आहे. चित्रपटगृह वीकेंडला बऱ्याच वेळा फुल होतं. सोमवारी थिएटरबाहेर बोर्ड लावून मंगळवारचा शो रद्द झाल्याची माहिती प्रेक्षकांना देण्यात आली होती. मराठा मंदिरची सुरुवात 1950 मध्ये झाली. त्यानंतर पहिल्यांदाच या थिएटरमध्ये ट्रेलर लाँच होत आहे.
आणखी वाचा
 

बॉलिवूडमध्ये वर्णभेद? नवाजने दिले संकेत

जेव्हा अप्सरा मेट बादशाह शाहरुख खान

दाऊदच्या बहिणीपासून सुरु झालेल्या हसीनाचा प्रवास गॉडमदर आणि गँगस्टरपर्यंत येऊन कसा थांबला याचं चित्रण ह्यहसीना पारकर" या सिनेमात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. सिनेमातून गुन्हेगारी विश्व, गँगवॉर आणि एका वेगळ्या मुंबईची झलक पाहायला मिळणार आहे. या सिनेमातून दाऊद इब्राहिमच्या भूमिकेत श्रद्धाचा भाऊ सिद्धार्थ कपूर झळकणार आहे. या सिनेमाच्या माध्यमातून श्रद्धा कपूर आणि तिचा भाऊ सिद्धार्थ कपूर पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. तर सिनेमात श्रद्धाच्या पतीच्या म्हणजेच इब्राहिमच्या भूमिकतेत अभिनेता अंकुर भाटिया झळकणार आहे. 18 ऑगस्ट रोजी सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. विशेष म्हणजे सिनेमाची टॅगलाइनही सध्या प्रेक्षकांची दाद मिळवत आहे. अठ्ठासी केसेस दर्ज, पर कोर्ट मे हाजरी सिर्फ एक बार ही टॅगलाइन अनेकांनी शेअरही करत सिनेमाबद्दलची उत्सुकताही व्यक्त केली.

शाहरुख खान आणि काजोल यांच्या प्रमुख भूमिका असलेला डीडीएलजे ऑक्टोबर 1995 मध्ये चित्रपट प्रदर्शित झाला होता. तेव्हापासून आजपर्यंत तो मराठा मंदिरमध्ये दाखवला जात होता. याआधी शोले या सिनेमाचे सलग ५ वर्ष शो सुरु होते. मात्र डीडएलजेने त्यालाही मागे टाकीत नवा विक्रम केला. 

Web Title: For the first time DDLJ's show canceled in 22 years due to "Hasina" Shraddha Kapoor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.