Filmmaker Rajkumar Santoshi admitted to Nanavati hospital after cardiac related issues | छातीत दुखू लागल्यामुळं दिग्दर्शक राजकुमार संतोषी रुग्णालयात

मुंबई - दिग्दर्शक राजकुमार संतोषी यांची अचानक तब्येत बिघडल्यामुळं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आज रात्री अचानक त्यांच्या छातीत दुखू लागल्यामुळं नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.  हृदयरोगतज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. रुग्णालयातील सुत्रांनी याला दुजोरा दिला आहे.  

निर्माते अशोक पंडीत यांनी देखील राजकुमार संतोषी यांना छातीत दुखत असल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.  त्यांच्यावर उपचार सुरु असले तरी त्यांची प्रकृती स्थिर असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. नानावटी रुग्णालयातील हृदयरोगतज्ज्ञ डॉ. विवेक मेहन हे त्यांच्यावर उपचार करीत आहेत.

राजकुमार संतोषी सध्या अभिनेता रणदीप हुडा याला घेऊन एका सिनेमावर काम करीत आहेत. संतोषी हे बॉलिवूडमधील प्रसिद्ध व्यक्तीमत्व असून त्यांनी अनेक दर्जेदार सिनेमे दिले आहेत.  अंदाज अपना अपना, अजब प्रेम की गजब कहानी, फटा पोस्टर निकला हिरो सारखे कॉमेडी चित्रपट त्यांनी दिग्दर्शित केले आहेत. घायल, घातक, खाकी दामिनी सारखे अॅकशनपटाचेही दिग्दर्शन त्यांनी केलं आहे. राजकुमार संतोषी यांनी सलमान खान, आमिर खान, अमिताभ बच्चन यांच्यापासून रणबीर कपूर आणि शाहिद कपूर यांच्यासोबत काम केलं आहे. 

 


Web Title: Filmmaker Rajkumar Santoshi admitted to Nanavati hospital after cardiac related issues
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.