Dry Day for the rainy parties to raise! | ‘ड्राय डे’ चढवणार पावसाळी पार्ट्यांचा हँँगओव्हर!

श्रावणाच्या आगमनापूर्वी आषाढ महिन्याच्या पावसात ठिकठिकाणी होत असलेल्या ओल्या पार्ट्यांना आता लवकरच ऊत येणार आहे. त्यामुळे याच हंगामात, आनंदसागर प्रॉडक्शन हाऊस प्रस्तुत आणि संजय पाटील यांची निर्मिती असलेला ‘ड्राय डे’ हा सिनेमा आपल्या भेटीला येत आहे. येत्या १३ जुलैला सर्वत्र प्रदर्शित होत असलेल्या या सिनेमात मनमौजी तरुणाईची धम्माल-मस्ती दाखविण्यात आली आहे. पांडुरंग जाधव लिखित आणि दिग्दर्शित या सिनेमाचे नाव जरी ड्राय डे असले, तरी आजच्या तरुण पिढीची चंगळ यात आपल्याला पाहायला मिळणार आहे. ‘ड्राय डे’ सिनेमात लव्हस्टोरी नव्हे तर ब्रेकअप नंतरची धम्माल दाखवली असल्यामुळे बॅचलर लोकांसाठी हा सिनेमा मनोरंजनाची परिपूर्ण मेजवानी ठरेल. रंगभूमी व छोट्या पडद्यावर झळकलेला ऋत्विक केंद्रे या सिनेमाद्वारे मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करीत असून, त्याच्यासोबतीला मोनालिसा बागल ही नवोदित अभिनेत्री झळकणार आहे. एका मद्यधुंद रात्रीचा हँँगओव्हर चढवणाऱ्या या ‘ड्राय डे’मध्ये कैलाश वाघमारे, पार्थ घाटगे, चिन्मय कांबळी, आयली घिए, सानिका मुतालिक हे युवा कलाकार देखील झळकणार आहेत.


Web Title: Dry Day for the rainy parties to raise!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.