Dreaming organism | स्वप्निल करणार अवयवदान

स्वप्निल जोशीचा नुकताच वाढदिवस झाला. त्याने हा त्याचा वाढदिवस त्याच्या मित्रमैत्रिणींसोबत जोरात साजरा केला. हा वाढदिवस स्वप्निलसाठी खूपच खास आहे. कारण काहीच महिन्यांपूर्वी स्वप्निलच्या घरी एका नन्ही परीचे आगमन झाले आहे. स्वप्निलने हा त्याचा वाढदिवस अविस्मरणीय बनवण्यासाठी एक संकल्प केला आहे. अवयवदान हे श्रेष्ठदान असल्याचे आपण नेहमीच ऐकतो. अभिनेता स्वप्निल जोशीने मरणोत्तर फुफ्फुस, मूत्रपिंड आणि स्वादुपिंड दान करण्याचा निर्णय घेतला आहे आणि त्यासाठी त्याने त्याच्या वाढदिवसाला अवयवदानाचा फॉर्मदेखील भरला आहे. एवढेच नव्हे, तर त्याच्यासोबत त्याच्या वाढदिवशी आम्ही स्वप्निलकर आणि टीम स्वप्निल या त्याच्या फॅन क्लबमधील अनेकांनीही अवयवदानाचा फॉर्म भरला. जवळजवळ २५ जणांनी नेत्रदान आणि त्वचादानचा निर्णय या वेळी घेतला.


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.