...हा फोटो पाहून दिग्दर्शकांनी अमिताभ बच्चन यांना ठरवलं वेडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2017 12:08 PM2017-07-20T12:08:09+5:302017-07-20T12:26:53+5:30

1977 मध्ये रिलीज झालेल्या "खून पसीना" चित्रपटाच्या शुटिंगदरम्यानचा एक फोटो अमिताभ बच्चन यांनी ट्विटरवर शेअर केला आहे

The director decided to call Amitabh Bachchan to see this photo | ...हा फोटो पाहून दिग्दर्शकांनी अमिताभ बच्चन यांना ठरवलं वेडा

...हा फोटो पाहून दिग्दर्शकांनी अमिताभ बच्चन यांना ठरवलं वेडा

googlenewsNext
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 20 - बॉलिवूड शेहनशहा अमिताभ बच्चन यांनी आपली एक जूनी आठवण शेअर केली आहे. 1977 मध्ये रिलीज झालेल्या "खून पसीना" चित्रपटाच्या शुटिंगदरम्यानचा एक फोटो अमिताभ बच्चन यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. या फोटोमध्ये अमिताभ बच्चन एका ख-या वाघासोबत दिसत आहेत. चित्रपटाचील एक सीनमध्ये अमिताभ बच्चन वाघाशी दोन हात करत असतात, त्यावेळी सेटवर एका ख-या वाघाला आणण्यात आलं होतं. अमिताभ बच्चन यांनी स्वत: हा धाडसी सीन शूट केला होता. मात्र त्यांचा हा फोटो पाहून स्टंट दिग्दर्शकांनी त्यांना वेडा म्हटलं आहे. स्वत: अमिताभ बच्चन यांनीच ही माहिती दिली आहे. 
 
 

अमिताभ बच्चन यांनी मंगळवारी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन एक ब्लॅक अॅण्ड व्हाईट फोटो शेअर केला. या फोटोत ते एका वाघासोबत दोन हात करताना दिसत आहेत. या फोटोसोबत अमिताभ यांनी कॅप्शन लिहिली आहे की, "खून पसीना चित्रपटाक एका ख-या वाघासोबत लढत होतो, एक खरं आव्हान होतं ते....आजच्या जमान्यातील स्टंट दिग्दर्शकांसोबत मी हे शेअर केलं....त्यांना वाटलं मी वेडा होतो". 

 

Web Title: The director decided to call Amitabh Bachchan to see this photo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.