दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंहचं ठरलं डेस्टिनेशन वेडिंग? 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2018 05:02 PM2018-02-08T17:02:57+5:302018-02-08T17:03:51+5:30

टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्या लग्नानंतर आता बॉलिवूडमधील हॉट कपल दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह यांच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरू आहे.

Deepika Padukone and Ranveer Singh marriage fixed media both will do destination wedding | दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंहचं ठरलं डेस्टिनेशन वेडिंग? 

दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंहचं ठरलं डेस्टिनेशन वेडिंग? 

googlenewsNext

मुंबई - टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्या लग्नानंतर आता बॉलिवूडमधील हॉट कपल दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह यांच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरू आहे. या दरम्यानच दीपिका आणि रणवीरच्या चाहत्यांसाठी एक खूशखबर समोर आली आहे. या दोघांचीही मुख्य भूमिका असलेला पद्मावत सिनेमा सध्या बॉक्सऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. 'पद्मावत' व्यतिरिक्त दोघंही आता लग्नासंबंधीच्या बातम्यांमुळे चर्चेत आहेत. दोघंही लवकरच लग्नबेडीत अडकणार असल्याचा चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगत आहेत. मात्र, सध्या सुरू असलेल्या नवीन गॉसिपनुसार,  दोघंही लवकरच डेस्टिनेशन वेडिंग करणार असल्याचं वृत्त समोर आले आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, दीपिका आणि रणवीर डेस्टिनेशन वेडिंगचं प्लॅनिंग जोरदार सुरू आहे. यावर्षीच दीपिका आणि रणवीर लग्नबेडीत अडकण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र दोघांकडूनही अद्याप याबाबत अधिकृतरित्या कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. मात्र विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांच्याप्रमाणेच दीपिका-रणवीरही गुपचुप लग्न थाटणार असल्याचंही म्हटले जात आहे.  दीपिका आणि रणवीर गुपचुप लग्न करुन आपल्या चाहत्यांना खूशखबर देऊ शकतात. 2018 वर्षांच्या अखेरपर्यंत दीपिका-रणवीर विवाह करू शकतात आणि हे डेस्टिनेशन वेडिंग असेल, अशी चर्चा आहे. 

दरम्यान, एका मुलाखतीदरम्यान दीपिकानं डेस्टिनेशन वेडिंगची इच्छा जाहिररीत्या व्यक्त केली होती. रणवीर आणि दीपिका दोघंही एकमेकांना खूप पसंत करतात. अनेकदा जाहिररित्याही त्यांच्या प्रेमाचं दर्शन घडले आहे. 
 

Web Title: Deepika Padukone and Ranveer Singh marriage fixed media both will do destination wedding

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.