रणवीर-दीपिकाची लग्नाची तयारी जोरात, इथे घेऊ शकतात घर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2018 04:47 PM2018-04-26T16:47:19+5:302018-04-26T16:50:14+5:30

मीडिया रिपोर्टनुसार ही जोडी या वर्षाच्या शेवची लग्न बेडीत अडकण्याची शक्यता आहे. 

Deepika Padukone and Ranveer Singh can be neighbor of Virat Kohli and Anushka Sharma | रणवीर-दीपिकाची लग्नाची तयारी जोरात, इथे घेऊ शकतात घर

रणवीर-दीपिकाची लग्नाची तयारी जोरात, इथे घेऊ शकतात घर

googlenewsNext

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून अभिनेता रणवीर सिंग आणि अभिनेत्री दीपिका पाडुकोन यांच्या लग्नाच्या चर्चा रंगल्या आहेत. मीडिया रिपोर्टनुसार ही जोडी या वर्षाच्या शेवची लग्न बेडीत अडकण्याची शक्यता आहे. 

अशात दोघेही शॉपिंग करण्यासोबतच आपल्या नव्या घराचा शोधही घेत आहेत. दोघांनी लग्नांची जोरदार तयारी सुरु केल्याचे दिसते आहे. मीडिया रिपोर्टनुसार, दीपिका आणि रणवीर दोघे लवकरच विराट कोहली आणि अनुष्का शर्माचे शेजारी होऊ शकतात.

असे सांगितले जात आहे की, दीपिका आणि रणवीर काही दिवसांपूर्वीच घराच्या शोधात ओमकार 1973 मध्ये गेले होते. इथेच विराट आणि अनुष्काचं घर होतं. आता दोघेही दुसरीकडे घर बघत आहेत. यांच बिल्डींगमध्ये रणवीर आपल्या आई-वडिलांना घेऊन गेला होता.

दीपिका आणि रणवीर या दोघांनाही येथील प्रॉपर्टी खूप आवडल्याचे बोलले जात आहे. जर सगळंकाही ठिक असलं तर दोघे ही प्रॉपर्टी खरेदी करु शकतात. पण सध्या दोघांनीही यावर काहीही अधिकृत घोषणा केलेली नाहीये. पण अंदाज हाच लावला जात आहे की, लग्नाआधी दोघे या घरात शिफ्ट होऊ शकतात. 

Web Title: Deepika Padukone and Ranveer Singh can be neighbor of Virat Kohli and Anushka Sharma

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.