मराठमोळे विनोदी अभिनेते संतोष मयेकर यांचे हृदयविकाराच्या झटक्यानं निधन

By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2018 11:23 PM2018-10-02T23:23:26+5:302018-10-03T08:53:13+5:30

दूरचित्रवाणीवरील फू बाई फू या रिअ‍ॅलिटी शोमधून त्यांनी त्यांची विशेष छाप पाडली. घडलंय बिघडलंय, आभाळमाया, निघाली कॉमेडीची एक्स्प्रेस,

Comedy Marathi actor dies due to heart attack, santosh mayekar | मराठमोळे विनोदी अभिनेते संतोष मयेकर यांचे हृदयविकाराच्या झटक्यानं निधन

मराठमोळे विनोदी अभिनेते संतोष मयेकर यांचे हृदयविकाराच्या झटक्यानं निधन

googlenewsNext

मुंबई : चित्रपट, नाटक व दूरचित्रवाणीवरील कार्यक्रमांतून दर्जेदार अभिनयासह विनोदाचे उत्तम टायमिंग साधणारे अभिनेते संतोष मयेकर (५२) यांचे मंगळवारी (2 सप्टेंबर) संध्याकाळी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. बुधवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार होतील. मराठी रंगभूमी आणि रुपेरी पडद्यावर त्यांनी विविध भूमिका साकारल्या. नाटकांमध्ये प्रामुख्याने त्यांनी विनोदी अभिनेता म्हणून ओळख निर्माण केली होती.

मालवणी भाषेवर त्यांचे प्रभुत्व होते. ‘वस्त्रहरण’ या तुफान लोकप्रिय नाटकात तात्या सरपंचाच्या भूमिकेचे आव्हान उत्तमरीत्या पेलत त्यांनी त्यांचे रंगभूमीवरील स्थान अधिक बळकट केले. आॅल द बेस्ट, प्रेमा तुझा रंग कसा, विच्छा माझी पुरी करा, टाइम प्लीज, भैया हातपाय पसरी, वाऱ्यावरची वरात आदी नाटकांतही त्यांनी दमदार भूमिका साकारल्या. गेल्यावर्षी राष्ट्रीय पुरस्कारांवर मोहोर उमटविणाऱ्या ‘दशक्रिया’ या चित्रपटातील त्यांची भूमिका गाजली होती. देवाशप्पथ खोटे सांगेन, चष्मे बहाद्दर, गलगले निघाले, सत्य सावित्री आणि सत्यवान, सातबारा कसा बदलला, आयपीएल-इंडियन प्रेमाचा लफडा, आर्त आदी चित्रपटांतही त्यांनी लक्षवेधी काम केले होते.

दूरचित्रवाणीवरील फू बाई फू या रिअ‍ॅलिटी शोमधून त्यांनी त्यांची विशेष छाप पाडली. घडलंय बिघडलंय, आभाळमाया, निघाली कॉमेडीची एक्स्प्रेस, ढिंका चिका आदी मालिका व कार्यक्रमांतून त्यांनी प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले. नाट्यदर्पण पुरस्कार, नाट्य परिषदेचा पुरस्कार, संस्कृती कलादर्पण आदी पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले होते.

Web Title: Comedy Marathi actor dies due to heart attack, santosh mayekar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Deathमृत्यू