Coffee and much more ... the sequel soon | कॉफी आणि बरेच काही... चा सीक्वल लवकरच

प्रार्थना बेहेरे, वैभव तत्त्ववादी आणि भूषण प्रधान यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘कॉफी आणि बरंच काही’ हा चित्रपट प्रचंड गाजला होता. या चित्रपटाची कथा, या चित्रपटातील कलाकारांच्या भूमिका प्रेक्षकांना खूप आवडल्या होत्या. या चित्रपटाच्या यशानंतर ‘कॉफी आणि बरंच काही’ या चित्रपटाच्या सीक्वलची तयारी सुरू झाली आहे. या चित्रपटाच्या कथेवर सध्या काम सुरू असून, या चित्रपटाच्या चित्रीकरणाला लवकरच सुरुवात होणार असल्याची चर्चा आहे. या चित्रपटाच्या सीक्वलमध्येही प्रार्थना, वैभव आणि भूषण झळकणार असल्याचे म्हटले जात आहे.


Web Title: Coffee and much more ... the sequel soon
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.