ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 8 - बाहूबली चित्रपटात आपल्या जबरदस्त लूकने सर्वांवर छाप पाडणा-या प्रभासचा एक फोटो सध्या व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये प्रभास पुर्णपणे क्लीन शेव्ह दिसत आहे. बाहुबली चित्रपटातील पिळदार मिशा आणि दाढीमधील प्रभासचा लूक चाहत्यांना प्रचंड आवडला होता. प्रभासला चित्रपटानंतर अनेक तरुणींकडून लग्नाची मागणीही घालण्यात आली होती. मात्र प्रभासचा हा नवा फोटो व्हायरल होत असून क्लीन शेव्ह लूकमुळे त्याला ओळखणंही कठीण जात आहे. 
 
प्रभासचा त्याचा आगामी चित्रपट "साहो"साठी हा नवा लूक ठेवला असल्याचं बोललं जात आहे. प्रभासचा हा फोटो त्याच्या इन्स्टाग्रामवरील फॅन्स पेजवर अपलोड करण्यात आला आहे. हे प्रभासचं अधिकृत अकाऊंट नाही आहे. त्यामुळे या फोटोची सत्यता पडताळणं थोडं कठीण असून संशयास्पद आहे. फोटोमधील व्यक्ती प्रभास आहे यामध्ये कोणताच वाद नाही. पण हा नवा लूक "साहो" चित्रपटासाठीच आहे का ? याबद्दल मात्र थोडी शंका आहे. 
 
"साहो" चित्रपटाचा जो ट्रेलर समोर आला आहे त्यामध्ये प्रभासता क्लिन शेव्ह दिसत नाही. त्यामुळे फोटोमागील सत्यता चित्रपटाचं शुटिंग संपल्यानंतरच कळेल. 
 
बाहुबलीच्या प्रचंड यशानंतर प्रभास काही महिन्यातच "साहो" चित्रपटाच्या शुटिंगला सुरुवात करणार आहे. पुढील वर्षी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.