‘वजनदार’ अभिनेता चिराग पाटील नुकताच रोडट्रिपला जाऊन आला. तिथे त्याने त्याचा वाढदिवसही साजरा केला. वाढदिवसाचं गिफ्टसुद्धा त्याला तितकाच वजनदार मिळालं आहे. हे गिफ्ट म्हणजे चिरागची नवीकोरी बाईक. चिरागला हे खास गिफ्ट त्याचे बाबा म्हणजेच भारताचे माजी क्रिकेटर संदीप पाटील यांनी दिलं आहे. चिराग त्याच्या या रेनेगेड कमांडो बाईकच्या खूपच प्रेमात असल्याचं दिसून येतंय. या बाईकसोबतचे काही फोटोदेखील चिराग पाटीलने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. चिरागच्या चाहत्यांनीदेखील त्याच्या या नव्या बाईकला पसंती दर्शवली आहे. १० मार्चला चिराग पाटीलचा वाढदिवस होता. वाढदिवसाच्या निमित्तानं पत्नी सनासह १५ दिवसांसाठी चिराग रोड ट्रिपला गेला होता. त्यासाठी त्याने त्याचे शूटिंगचे शेड्युअलही रद्द केले होते. नैनिताल, उदयपूर अशा वेगवेगळ्या ठिकाणांना त्याने भेट दिली. त्या-त्या जागेचं वैशिष्ट्य चिरागनं जाणून घेतलं.शिवाय, वेगवेगळ्या गोष्टींची माहिती आणि त्या ठिकाणाचे खास फोटोही सोशल मीडियावर अपलोड केले आहेत. त्यामुळे त्याचा हा वाढदिवस त्याने अगदी हटके पद्धतीने सेलिब्रेट केला आहे. त्यानंतर आता रोड ट्रिपवरून परतल्यानंतर बाबांकडून मिळालेलं वाढदिवसाचं सरप्राईज गिफ्ट पाहून तर चिरागचा आनंद नक्कीच द्विगुणित झाला असणार.