लग्नाआधी 6 अभिनेत्यांना डेट करत होती बिपाशा बसू

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2018 04:49 PM2018-04-18T16:49:27+5:302018-04-18T16:51:56+5:30

बिपाशाचं लव्हलाईफ फारच चर्चेत होतं. करणसोबत लग्न करण्याआधी बिपाशाचे 6 अफेअर होते. 

Bipasha Basu dated six actors before marrying | लग्नाआधी 6 अभिनेत्यांना डेट करत होती बिपाशा बसू

लग्नाआधी 6 अभिनेत्यांना डेट करत होती बिपाशा बसू

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री बिपाशा बसू सध्या सिनेमांपासून दूर राहून आपल्या घर-संसारात रमली आहे. ती अनेकदा पती करण सिंह ग्रोवरसोबतचे खाजगी क्षणांचे फोटोज शेअर करत असते. कदाचित फारच कमी लोकांना माहिती असेल की, 3 वर्षाने लहान बॉयफ्रेन्डसोबत लग्न करणा-या बिपाशाचं हे सातवं अफेअर होतं. बिपाशाचं लव्हलाईफ फारच चर्चेत होतं. करणसोबत लग्न करण्याआधी बिपाशाचे 6 अफेअर होते. 

1) मिलिंद सोमण

बिपाशा बसुचा पहिला बॉयफ्रेन्ड मिलिंद सोमण हा आहे. होय...बिपाशा मिलिंद सोमण सोमणला डेट करत होती. ज्यावेळी बिपाशा फॅशन विश्वात आली होती, तेव्हा मिलिंद सुपर मॉडल होता. एका शोमध्ये त्यांची भेट झाली होती. त्यानंतर त्यांनी एकमेकांना डेट करणे सुरु केले होते. पण त्यांचं नातं फार काळ टिकलं नाही. 

2) डिनो मोरिया

मिलिंद सोमणनंतर बिपाशा 'राज' सिनेमावेळी डिनो मोरियाच्या संपर्कात आली. दोघांच्याही अफेअरची बी-टाऊऩमध्ये जोरदार चर्चा रंगली होती. रिपोर्टनुसार, 'राज' सिनेमावेळी जवळ आलेलं हे कपल 2002 मध्ये वेगळं झालं. डिनो मोरियानेही याची कबूली दिली होती.

3) जॉन अब्राहम

बॉलिवूडमध्ये बिपाशा आणि जॉनच्या अफेअर इतकी चर्चा कुणाचीही झाली नाही. डिनोनंतर बिपाशा जॉनसोबत रिलेशनशिपमध्ये होती. हे इंडस्ट्रीतील हॉटेस्ट कपल मानलं जायचं. दोघेही 9 वर्ष रिलेशनशिपमध्ये होते. पण बिपाशा जॉनवर लग्नाचा दबाव आणत असल्याने दोघे वेगळे झाल्याचं बोललं जातं. 

4) राणा दग्गुबती

'बाहुबली' सिनेमातून चर्चेत आलेला अभिनेता राणा दग्गुबती सुद्धा या यादीत होता. बिपाशा आणि राणाने दम मारो दम सिनेसात एकत्र काम केलं होतं. या सिनेमाच्या सेटवरच दोघांमध्ये प्रेम झालं. पण हे रिलेशनशिप फार काळ टिकलं नाही. असं म्हणतात की, राणाने बिपाशाला चीट केलं होतं.

5) सैफ अली खान

राणा दग्गुबतीनंतर सैफसोबत बिपाशाचं नाव जोडलं गेलं. 'रेस 2' सिनेमावेळी दोघांच्या लिंकअपची चर्चा झाली होती. त्यावेळी सैफ सिंगल होता. पण नंतर 2012 मध्ये त्याने करिनासोबत लग्न केले.

6) हरमन बवेजा

19 फेब्रुवारी 2014 मध्ये बिपाशाने आपलं सहावं अफेअर जाहीर केलं होतं. बिपाशा हरमन बवेजासोबत रिलेशनशिपमध्ये होती. बिपाशाने स्वत: एक ट्विट करुन याबाबत माहिती दिली होती. पण केवळ सहा महिन्यांनीच हे कपल वेगळं झालं. 

Web Title: Bipasha Basu dated six actors before marrying

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.