Ajay Devgn to debut in Marathi film | आपला माणूस ! अजय देवगणची मराठी चित्रपटात एंट्री

ठळक मुद्देअजय देवगण लवकरच मराठी चित्रपटात झळकणार आहेअजय देवगण 'आपला माणूस' चित्रपटातून मराठी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे9 फेब्रुवारी 2018 रोजी हा चित्रपट रिलीज होणार आहे

मुंबई - बॉलिवूडमध्ये आपला वेगळा ठसा उमटवणारा अजय देवगण लवकरच मराठी चित्रपटात झळकणार आहे. 25 वर्ष बॉलिवूडमध्ये आपल्या वेगळ्या आणि कसदार अभिनयाने स्व:तची वेगळी ओळख निर्माण करणारा अजय देवगण  'आपला माणूस' चित्रपटातून मराठी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'मुंबई-पुणे-मुंबई, एका प्रेमाची गोष्ट, ती सध्या काय करतेय' असे सुपरहिट चित्रपट देणारे सतीश राजवाडे या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहे. 
चित्रपटात नाना पाटेकर, सुमीत राघवन, इरावती हर्षे अशी तगडी स्टारकास्ट दिसणार आहे. अजय देवगण चित्रपटात पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारताना दिसणार असल्याची माहिती आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने आपली अनेक दिवसांची इच्छा पूर्ण होत असल्याचं अजय देवगणने सांगितलं आहे. त्याने ट्विटरवर एक व्हिडीओ अपलोड केला आहे. 

अजय देवगणने ट्विटवर एक व्हिडीओ अपलोड केला असून आपली इच्छा पुर्ण होत असल्याचं सांगत मराठी चित्रपटात झळकणार असल्याचं सांगितलं आहे. 'महाराष्ट्रासोबत माझं नातं जन्मापासूनचं आहे. मराठी भाषेसाठी मनात पहिल्यापासूनच आदर आहे. पण काजोलशी लग्न झाल्यापासून महाराष्ट्राची भाषा, संस्कृतीच्या आणखी जवळ आलो. या संस्कृतीवर प्रेम जडलं. या संस्कृतीमुळेच मराठी चित्रपटांची आज एक वेगळी ओळख आहे. मराठी चित्रपटसृष्टीचा एक भाग होण्यासाठी 'आपला माणूस'मधून मी तुमच्यापुढं येत आहे. आशिर्वाद असून द्या,' अशा भावना अजय देवगणने व्हिडीओतून व्यक्त केल्या आहेत. 


अजय देवगणने याआधी 'सिंघम' चित्रपटात मराठी पोलीस अधिका-याची भूमिका बजावली आहे. बाजीराव सिंघम हे पात्र मराठी प्रेक्षकांना प्रचंड आवडलं होतं. पण मराठी चित्रपटात काम करण्याची अजयची ही पहिलीच वेळ असणार आहे. अभिनेता रितेश देशमुखने अजय देवगण आणि काजोलला या चित्रपटासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. 9 फेब्रुवारी 2018 रोजी हा चित्रपट रिलीज होणार आहे.  


Web Title: Ajay Devgn to debut in Marathi film
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.