योग- उत्तम व्यवस्थापन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2017 12:40 AM2017-11-28T00:40:00+5:302017-11-28T00:40:14+5:30

व्यवस्थापन हा एक आधुनिक विषय आहे असे मानले जाते. या विषयाचा मूळ उद्देश आर्थिक लाभ हा आहे. शेवटी आधुनिक व्यवस्थापनात प्रत्येक काम हे अर्थ (पैसा) यास केंद्रबिंदू ठरवून केले जाते.

 Yoga - Better Management | योग- उत्तम व्यवस्थापन

योग- उत्तम व्यवस्थापन

Next

- डॉ. भूषण कुमार उपाध्याय

व्यवस्थापन हा एक आधुनिक विषय आहे असे मानले जाते. या विषयाचा मूळ उद्देश आर्थिक लाभ हा आहे. शेवटी आधुनिक व्यवस्थापनात प्रत्येक काम हे अर्थ (पैसा) यास केंद्रबिंदू ठरवून केले जाते. दुस-या शब्दात असे म्हटले जाऊ शकते की व्यवस्थापन हे व्यापारी वृत्तीने संचालित केले जाते.
परंतु हजारो वर्षापूर्वी भारत देशामध्ये असे एक व्यवस्थापन-विज्ञान निर्माण झाले होते की ज्याचा मूळ उद्देश अर्थ (पैसा) हा नव्हता तर ‘आनंद’ हा होता. या व्यवस्थापन-विज्ञानानुसार अर्थ हे साधन मानले गेले आणि आनंद यास साध्य मानले गेले. शेवटी आपल्या जीवनाचा उद्देश हा अर्थार्जन नाही तर आपल्या चेतनेमध्ये मोकळ्या आनंदाचा आस्वाद घेणे हा आहे. प्राचीन भारतामध्ये या आत्मानंदास प्राप्त करण्यासाठी खोलवर जाऊन शोध घेतला होता. ऋ षिमुनींनी बरीच वर्षे कठोर तपस्या करून व्यवस्थापनाच्या मूळ मंत्राचा शोध लावला. भारत देशामध्ये या लक्ष्यास प्राप्त करण्यासाठी हजारो पध्दती विकिसत झालेल्या आहेत. या पध्दतींपैकी योग ही एक प्रमुख पध्दत आहे.
सहा दर्शनामध्ये योग हे एक प्रमुख दर्शन आहे. या योग दर्शनाचे एक फार मोठे शास्त्र भारतामध्ये निर्माण झाले. हे योग-दर्शन खूप वैज्ञानिक आणि व्यावहारिक आहे. महर्षी पतंजली यांनी आपल्या पातंजल योगशास्त्रामध्ये खूपच सूक्ष्मपणे या विषयावर विवेचन केले आहे. या योग-सिध्दांतानुसार चित्त हा आपल्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. या चित्ताला आपण सामान्य भाषेत मन असे म्हणतो. शेवटी योगाद्वारे मनावर नियंत्रण करून त्याच्यावर विजय मिळविणे हाच उद्देश आहे.
या मनास नियंत्रित आणि स्थिर करण्यासाठी योगशास्त्रात अनेक वैज्ञानिक पध्दती सांगितलेल्या आहेत. आसन शरीराचे व्यवस्थापन आहे. प्राणायाम आपल्या श्वासास नियंत्रित करतो आणि ध्यान आपल्या मनास स्थिर करून त्यास अंतर्मुख करते. स्वस्थ शरीर, नियंत्रित श्वास आणि स्थिर मन हे उत्तम व्यक्तित्वाचे आधार आहेत. जेव्हा अशा प्रकारचे व्यक्तित्व तयार होते, तेव्हा जीवन हे आनंदाने भरले जाते.आज संपूर्ण जगामध्ये योगाची चर्चा होत आहे. आसन, प्राणायाम आणि ध्यान यांच्या अनेक पध्दती प्रचलित आहेत. लक्षावधी लोक याचा अभ्यास करून आनंदाची प्राप्ती करीत आहेत.

Web Title:  Yoga - Better Management

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.