विराटने आगे आकर खेलना था यार!

By यदू जोशी | Published: May 29, 2018 06:57 AM2018-05-29T06:57:30+5:302018-05-29T06:57:45+5:30

राजकारणीअन् एसटी बसमध्ये काहीही फरक नाही. राज्यातील शेवटच्या माणसाला घेऊन चालते ती एसटीच पण बंदच्या काळात फुटते; तीही एसटीच.

Virat came forward to come and play! | विराटने आगे आकर खेलना था यार!

विराटने आगे आकर खेलना था यार!

Next

राजकारणीअन् एसटी बसमध्ये काहीही फरक नाही. राज्यातील शेवटच्या माणसाला घेऊन चालते ती एसटीच पण बंदच्या काळात फुटते; तीही एसटीच. सरपंचांपासून पंतप्रधानांपर्यंत सर्वच राजकीय नेत्यांची परिस्थिती तीच. अंथरुणातून उठत नाही तर जी गाºहाणी सुरू होतात ती पुन्हा अंथरुणात जाईपर्यंत... (नेत्यांच्या बायका त्यांना काय म्हणत असतील कोण जाणे!) आडव्याउभ्याने फाडायची वेळ आली की लोकांना परत राजकारणीच दिसतात. नेतेही बिच्चारे पुढच्या पंचवार्षिकसाठी काय काय बोल सहन करत असतात. मोदींनी एक निर्णय घेतला रे घेतला की त्याचे विरोध-समर्थन करणारे सोशल मीडियातून फिरू लागतात. आपल्या देशात सल्ल्यांची वर्षातील ३६५ दिवस दुकाने थाटून बसणाऱ्यांची कमतरता नाही. सचिन असो की विराट कुणी आऊट झाले की यांचं दुकान लगेच सुरू, ‘अरे यार! उसने सामने आकर खेलना चाहीए था.’ आता ताशी दीडशे किलोमीटरच्या स्पीडने बॉल कानफटापासून जाताना तुम्ही स्वत: खेळून बघितलाय का कधी? पण नाही सल्ला देण्याचं त्यांचं पेटेंट आहे नं भौ! घरासमोरची फरशी लावण्यापासून देश विकासाच्या बड्या योजनांपर्यंत सगळं काही नेत्यांनीच कसं करावं यासाठीचा सल्लारूपी माल त्यांच्याकडे तयार असतो. घरचा महिन्याकाठचा हिशेब नीट सांभाळता येणार नाही पण मोदी सरकारच्या चार वर्षांच्या कामगिरीचा हिशेब विचारायला चटकन तयार. बायकोनं चार वस्तू बाजारातून आणायला सांगितल्या तर त्यातलीही एक विसरतील पण तीन वर्षांपूर्वी कोडाइकॅनलमध्ये परकीय गुंतवणुकीसंदर्भातील एका सेमिनारमध्ये बोलताना मोदींनी दिलेल्या आश्वासनाची आठवण मात्र बरोब्बर ठेवतील. नियमानुसार असलेल्या वर्षभरातील एकूणएक सुट्या घेतील पण वर्षभरात एकही दिवस सुटी न घेणाºया मोदींना प्रत्येक गोष्टीसाठी जाब विचारतील. घरातील निवडणुकीत बायकोचंही मत मिळणार नाही, असे लोक कर्नाटकात कुणाचं काय चुकलं हे सांगत सुटतील. देशाची काँग्रेस सांभाळणाºया राहुल गांधींची हालत तर फारच खराब... निवडणुकीत साºया गावात ज्याला सगळ्यात कमी मतं पडली असा माणूसही राहुलबाबांची चेष्टा करू शकतो अन् काँग्रेस कशी चालवायची हेही फुशारकीनं सांगतो. गांधी-आंबेडकर-सावरकर यांच्याबाबत मुक्तचिंतन करणाºयांनी त्यांचे साहित्य वा जीवनप्रवास किती अभ्यासलंय हे विचारण्याची सोय नसते. हातची कामं सोडून सल्ले वाटणं सुरू असतं.
कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या निवडणूक प्रचारात शिवसेनेचे मंत्री रामदास कदम यांनी मुख्यमंत्र्यांना ‘बच्चा’ म्हणत त्यांची खेचली होती. त्याला सडेतोड उत्तर देत मुख्यमंत्री जे काही म्हणाले ते जागोजागी तयार झालेल्या सल्लागारांनी लक्षात घेतलं तर महाराष्ट्रातील ऐंशी टक्के सामाजिक, राजकीय प्रश्न सुटू शकतील. मुख्यमंत्री म्हणाले होते, रामदासभाई! तुमचा पगार किती अन् तुम्ही बोलता किती...? आता मुख्यमंत्री-रामदासभार्इंचा वाद सोडा पण आपल्या पगाराइतकंच (म्हणजे आपल्या लायकीइतकं) बोलण्याचं पथ्य सगळ्यांनी पाळलं तर पुरोगामी महाराष्ट्राचं भलंच होईल पण वास्तविकता ही आहे की जो उठला तो आपल्या पगारापेक्षा जास्तच बोलत सुटतो. पगार (कुवत) चपराश्याचा अन् बोलणं आयएएसचं ही खरी अडचण आहे. सल्ल्याचं बोट धरून मोकाट फिरणाºयांनी समजूतदारपणाचं बोट धरलं तर किती बरं होईल?
- यदु जोशी

Web Title: Virat came forward to come and play!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.