व्यवसाय व राजकारणात धक्कातंत्राचा वापर हेच नवे साधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2018 12:47 AM2018-01-03T00:47:03+5:302018-01-03T00:47:26+5:30

व्यवसायात तसेच राजकारणातसुद्धा यशस्वी होण्यासाठी सतत नवीन डावपेच वापरण्यात येत असतात. तोच तोपणा बाजूला सारून धक्कातंत्राचा वापर करणे सुरू झाले आहे. व्यवसाय आणि राजकारण यांच्यात याबाबतीत साम्य आहे. यशस्वी प्रचार मोहीम राबविण्यासाठी जोएम ब्रॉडशा या राजकीय विचारवंताने एकेकाळी जे चार सिद्धान्त प्रस्थापित केले होते, ते आता कालबाह्य झाले आहेत.

 The use of exploitation in business and politics is a new tool | व्यवसाय व राजकारणात धक्कातंत्राचा वापर हेच नवे साधन

व्यवसाय व राजकारणात धक्कातंत्राचा वापर हेच नवे साधन

Next

- डॉ. एस.एस. मंठा
माजी चेअरमन, एआयसीटीई
एडीजे. प्रोफेसर, एनआयएएस बंगळुरू

व्यवसायात तसेच राजकारणातसुद्धा यशस्वी होण्यासाठी सतत नवीन डावपेच वापरण्यात येत असतात. तोच तोपणा बाजूला सारून धक्कातंत्राचा वापर करणे सुरू झाले आहे. व्यवसाय आणि राजकारण यांच्यात याबाबतीत साम्य आहे. यशस्वी प्रचार मोहीम राबविण्यासाठी जोएम ब्रॉडशा या राजकीय विचारवंताने एकेकाळी जे चार सिद्धान्त प्रस्थापित केले होते, ते आता कालबाह्य झाले आहेत.
नव्या उपक्रमातून विकास साधण्यासाठी धक्कातंत्राचा उपयोग हे आता प्रभावी माध्यम ठरले आहे, असे हार्वर्ड बिझिनेस रेव्ह्यू या नियतकालिकाने दोन वर्षापूर्वी स्पष्ट केले होते. डिलाईट युनिव्हर्सिटी प्रेसचा धक्कातंत्रविषयक अहवाल हा त्यादृष्टीने महत्त्वाचा आहे. लहान कंपन्यांच्या मालकांनी या अहवालांना मार्गदर्शक म्हणून स्वीकारले आहे. इन्टेल, सदर्न न्यू हँपशायर विद्यापीठ आणि सेल्सफोर्स डॉट काम यांनीही यशस्वी होण्यासाठी धक्कातंत्राचा वापर करण्यास मान्यता दिली आहे.
ज्या कंपन्यांना बँका आणि पतसंस्था यांचेकडून पारंपरिक कर्ज मिळत नाही, त्यांना कर्ज देण्याचे काम एम.सी.सी. (मर्चंट कॅश अँड कॅपिटल) ही संस्था करीत असते. या संस्थेने कर्ज देताना लागणारी व्यक्तिगत हमी बाजूला सारून कर्ज देण्यास सुरुवात केली आहे. जे कर्ज मिळायला पूर्वी कित्येक दिवसच नव्हे तर कित्येक महिने लागत ते कर्ज या संस्थेतर्फे तीन दिवसात मिळू लागले. त्यामुळे या संस्थेने प्रस्थापित संस्था आणि परंपरांना हादरे दिले आहेत. ती संस्था नव्या परंपरा निर्माण करीत आहे. त्यामुळे पूर्वी यशस्वी ठरलेल्या कंपन्या गडबडल्या आहेत. याच धक्कातंत्राचा वापर करण्याचे काम आता अलीकडच्या राजकारणाने सुरू केले आहे.
अव्यवस्था निर्माण करण्याच्या प्रक्रियेची हॉर्वर्ड बिझिनेस रेव्ह्यूू या नियतकालिकाने व्याख्या केली आहे. कमी साधने असलेली एखादी कंपनी एखाद्या प्रस्थापित कंपनीला आव्हान देत स्वत:च्या उत्पादनात आणि सेवेतसुद्धा सुधारणा घडवून आणते, तेव्हा ती प्रस्थापित व्यवस्थेला झुगारूनच देत असते.
आतापर्यंत दुर्लक्षित राहिलेल्या घटकांवर ती लक्ष केंद्रित करते. तसेच कमी किमतीत अधिक उपयुक्त वस्तूंचा पुरवठा करते, त्या वस्तूच्या मागणीत वाढ करते. त्यामुळे प्रस्थापित उद्योगांनाही त्याच मार्गाचा अवलंब करणे भाग पडते. राजकारणातसुद्धा हे तंत्र उपयोगी पडू शकते व ते प्रस्थापित पक्षांना धक्के देऊ शकते.
या सिद्धांताचा उपयोग करून प्रस्थापित पक्षाला आव्हान देणाºया एका पक्षाने तंत्रज्ञांच्या मदतीने तंत्रज्ञानाचा योग्य पद्धतीने उपयोग करून, आपल्या सेवाकार्यात वाढ करून प्रस्थापितांना खूपच मागे ढकलले आहे. त्यामुळे प्रस्थापितांना त्यांचेशी स्पर्धा करणे शक्य होत नाही. त्यासाठी त्यांना नवीन धक्कातंत्राचा शोध घ्यावा लागतो आणि त्याचा वापर करावा लागतो. तेव्हा कुठे त्यांना यश दिसू लागते.
व्यवसायाच्या क्षेत्रात उबेरने केलेल्या प्रगतीचे उदाहरण या संदर्भात देता येईल. राजकीय क्षेत्रात देखील प्रस्थापित पक्ष आणि त्याला आव्हान देणारा पक्ष असे उदाहरण उपलब्ध आहे. आव्हान देणाºया पक्षाने धक्कातंत्राचा जो वापर केला तोच आता प्रस्थापित पक्षाला देखील करावा लागणार आहे. धक्कातंत्रात काळ्या पैशाचे कंबरडे मोडणारी नोटबंदी किंवा संपूर्ण देशभर लागू झालेला वस्तू व सेवा कर किंवा डिजिटल अर्थकारणाचा उपयोग किंवा तिहेरी तलाक रद्द करण्याचे विधेयक यांचा समावेश करता येईल. सेवांसाठी ‘आधार’ जोडल्यामुळे निर्माण होणाºया शक्यता अद्याप स्पष्ट झाल्या नाहीत. सेवांना आधार जोडल्याने एकतर पूर्वी कधी झाली नाही याप्रकारे माणसे जोडली जातील किंवा मानवी जीवन दुरुस्त होण्यापलीकडे उद्ध्वस्त होईल!
देशाच्या वैचारिक धारणेत बदल घडवून आणणारे नवे धक्कातंत्र वापरले तर त्याच्या अंमलबजावणीसाठी नवे डावपेच वापरावे लागतात. मूल्य व्यवस्थेत बदल घडवून आणण्यासाठी वापरण्यात येणारे धक्कातंत्र नेहमीच वापरता येत नाही. उलट त्यात मिळालेल्या अनुभवातून बदल न केल्यास ते अपयशी ठरण्याचाही धोका संभवतो. मग त्या पद्धतीच्या उपयोगितेकडे दुर्लक्ष केले जाऊ शकते.
कधी कधी सांस्कृतिक आणि सामाजिक परंपरांचे पालन न करणेही आवश्यक असते. धक्कातंत्रामुळे पक्षाचा किती फायदा होईल याचा अंदाज बांधून त्यादृष्टीने धक्कातंत्राचा वापर करून पक्षाला त्या उंचीपर्यंत नेले जाऊ शकते. बुलेट ट्रेन, सागरी विमान सेवा, सागरी वाहतूक या नवीन कल्पना असून त्यांचे लोकांना आकर्षण वाटत असते. गुजरातच्या निवडणुकांनी या धक्कातंत्राची उपयोगिता दाखवून दिली आहे. त्या निवडणुकीत सर्व पक्षांचे महत्त्वाचे नेते उतरले होते. एखाद्या राज्याची निवडणूक एवढ्या गांभीर्याने घेतली गेल्याचे दुसरे उदाहरण आढळणार नाही.
धक्कातंत्रासाठी निरनिराळ्या साधनांचा वापर करण्यात येतो. कधी ते टष्ट्वीट असते किंवा एखाद्या प्रचारधर्माची सुरुवात असते. त्यात तंत्रज्ञान महत्त्वाची भूमिका बजावीत असते. परंपरांना आव्हान देणाºयांनी दोन वर्षांपूर्वी तंत्रज्ञानाचा वापर केला आणि आजही तो विविध प्रकारे करण्यात येत आहे. त्यासाठी तज्ज्ञांचा वापर केला जातो. त्यासाठी विविध प्रकारची माहिती गोळा करून ती कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून लोकांपर्यंत पोचविली जाते. त्याचा प्रथम उपयोग करणारा पहिल्या क्रमांकावर राहतो तर नंतर उपयोग करणाºयाला दुसºया क्रमांकावर समाधान मानावे लागते. लोकमानस जाणून घेण्याचा सध्याचा काळ आहे. सतत स्पर्धा सुरू असते. ती कधी थांबत नाही. धक्कातंत्राचा वापर केल्यावर त्याची साहजिकच प्रतिक्रिया उमटते. राजकारणात धूर्तपणा आवश्यक असतो. आले अंगावर घेतले शिंगावर हा राजकारणात तरी गुण समजला जातो.
सध्या डिजिटलचे धक्कातंत्र वापरणे सुरू आहे. हा वापर राजकीय नेत्यांकडून केला जात आहे हेही तसे धक्कादायकच म्हटले पाहिजे!
 

Web Title:  The use of exploitation in business and politics is a new tool

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.