शीतलदेवींचा असाही ‘नारीशक्ती अकलूज पॅटर्न’

By राजा माने | Published: March 7, 2018 12:32 AM2018-03-07T00:32:28+5:302018-03-07T00:32:28+5:30

‘वंशाचा दिवा’ मुलगीही ठरू शकते, हा विचार ग्रामीण भागात रुजल्याशिवाय मुलींचा जन्मदर वाढणार नाही. त्यासाठी प्रबोधनाबरोबरच औषधोपचारापासून शैक्षणिक सवलतीपर्यंतचे उपक्रम यशस्वी झाले. शीतलदेवी धैर्यशील मोहिते-पाटील यांचा ‘नारीशक्ती अकलूज पॅटर्न’ ग्रामीण महाराष्ट्राला या चळवळीत नवी दिशा देऊ शकतो.

Shital Devi's 'Nariashakti Akluj Pattern' | शीतलदेवींचा असाही ‘नारीशक्ती अकलूज पॅटर्न’

शीतलदेवींचा असाही ‘नारीशक्ती अकलूज पॅटर्न’

Next

आज देशभर बेटी बचाव आणि महिलांना सर्वार्थाने सशक्त बनविण्याची चळवळ गतिमान होताना दिसते. चळवळ करणाºया संस्था आणि त्यात क्रियाशील कार्यकर्त्यांची संख्या वाढताना दिसते. पण महिलांवरील अत्याचाराच्या घटना आणि मुलींच्या जन्मदराबाबत समाजात असलेली उदासिनता मात्र म्हणाव्या तशा गतीने कमी होताना दिसत नाही. त्याच उदासिनतेला हद्दपार करण्याचा सातत्यपूर्ण प्रयत्न चालल्याचे उदाहरण सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यात अकलूज येथे मिळते. जिल्हा परिषद सदस्या सौ.शीतलदेवी धैर्यशील मोहिते-पाटील यांनी गेल्या पाच वर्षांपासून विविध उपक्रमांच्या माध्यमातून ग्रामीण महाराष्टÑापुढे महिला सबलीकरणाचा नवा ‘नारीशक्ती अकलूज पॅटर्न’ ठेवला आहे.
केवळ शासकीय योजनांवर अवलंबून राहून मुलींचा जन्मदर वाढणार नाही. त्यासाठी सर्वच स्तरातील महिलांना प्रबोधनाबरोबरच सवलत सुविधाही द्याव्या लागतील याची जाणीव शीतलदेवी यांना झाली. या जाणिवेतून मुलगी हाच आपल्या कुटुंबाच्या वंशाचा दिवा ठरू शकते हा विचार रुजविण्याचा प्रयत्न त्यांनी वेगवेगळ्या संस्थांच्या उपक्रमांना एका छताखाली आणून केला. डॉटर्स मॉम, शिवरत्न फाऊंडेशन, शिवरत्न नॉलेज सिटी आणि माळशिरस तालुक्यातील विविध संस्थांच्या परिश्रमाला एकत्रित बळ देण्याचे काम त्यांनी केले. गर्भजल चाचणीसारखा गुन्हा ज्यावेळी अकलूजसारख्या गावात घडला, त्यावेळी त्यांनी त्या प्रवृत्तीच्या विरोधात आंदोलन उभे केले. अशा प्रवृत्तींना केवळ वेळोवेळी विरोध करून भागणार नाही तर ग्रामीण भागातील कुटुंबांमध्येच मुलीच्या जन्माचे स्वागत करण्याची मानसिकता तयार केली पाहिजे; या भावनेने त्यांनी महिला आणि मुलींच्या आरोग्यावर विशेष काम करण्याचा निर्णय घेतला. वेळीच औषधोपचार न झाल्याने अथवा औषधोपचारासाठी पैसा नसल्याने महिलांच्या होणाºया हेळसांडीवर उपाय करण्यासाठी संघटन उभे केले. माळशिरस तालुक्यातील तब्बल ५४७ डॉक्टर्सशी संपर्क साधून त्यांना नारीशक्ती सबलीकरण चळवळीत सहभागी होण्यास प्रवृत्त केले. उत्स्फूर्तपणे सहभागी झालेल्या या डॉक्टर्सनी महिलांना आजारपणात औषधोपचार खर्चात विशेष सूट देण्यास प्रसंगी मोफत औषधोपचार करण्यास सुरुवात केली. ही सुरुवात पाहता पाहता चळवळीत रुपांतरित झाली. त्याचाच परिणाम म्हणून ज्यावेळी २०१७-१८ या वर्षात महिलांच्या उपचारावर झालेल्या खर्चाचा अभ्यास करण्यात आला. त्यावेळी या वर्षभरात डॉक्टर्सनी दिलेल्या योगदानामुळे ४ कोटी ८७ लाख रुपये एवढ्या खर्चाची बचत झाल्याचे सिद्ध झाले.
ऊर्मिलादेवी शिष्यवृत्ती योजना, मिशन राजकुँवर, लेक वाचवा-लेक शिकवा यासारख्या योजनांचे काटेकोरपणे आयोजन करीत असतानाच परिसरातील मंगळवेढा, अक्कलकोट, सदाशिवनगर, मुस्ती, माळेवाडी येथील केवळ मुली असलेल्या १६०० कुटुंबांचा सन्मान करण्यात आला. मेळावे, चर्चासत्र, पदयात्रा यासारख्या जनजागृती मोहिमा घेत असताना मुलींसाठी शिक्षण क्षेत्रात सवलती देणाºया योजनाही त्यांनी सुरू केल्या. आज आपल्या देशाचे सहा वर्षे वयोगटातील मुलींचे प्रमाण १००० मुलांमागे ८९४ मुली एवढे आहे. देशपातळीवरही ते प्रमाण ९९४ एवढे आहे. ही विषमत: दूर करण्याचा प्रयत्न सौ.शीतलदेवी मोहिते-पाटील यांचा ‘नारीशक्ती अकलूज पॅटर्न’ करतो आहे.
 

Web Title: Shital Devi's 'Nariashakti Akluj Pattern'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.