जानकरांची ‘शापवाणी’!

By किरण अग्रवाल | Published: August 30, 2018 06:28 AM2018-08-30T06:28:08+5:302018-08-30T09:09:46+5:30

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी आपापली तयारी सुरू केली आहे. किती जागा लढायच्या, कुठून लढायच्या व तिथे उमेदवार कोण द्यायचे हा नंतरचा विषय; परंतु

'Shapravani' to know! | जानकरांची ‘शापवाणी’!

जानकरांची ‘शापवाणी’!

Next

ज्ञानाचे सांधे निखळतात तेव्हा मनाचे व पर्यायाने वाचेवरचे नियंत्रण सुटते असे अनुभवास येते. व्यक्ती अंधश्रद्धीय विचारांकडे वळण्याची प्रक्रिया त्यातूनच घडून येते. त्यामुळे संभाजी भिडे यांच्या शेतातील आंबे खाल्ल्याने मूलबाळ होईल का, हा प्रश्न जसा विज्ञान व वैद्यकशास्त्राला आव्हान देणारा ठरतो, तसा ब्रह्मचाऱ्याचा शाप कुणाचे काही नुकसान घडवू शकतो का व त्यातही राजकीय पक्ष-संघटना बांधणीच्या बाबतीत त्याचा कुठे काही संबंध जोडता येऊ शकतो का, असा प्रश्नही सुजाणांना डोके खाजवायला भाग पाडणारा ठरतो. विशेषत: राज्याचे दुग्धविकास व पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांच्यासारखे समाजाचे व राज्याचे नेतृत्व करणारेही असा प्रश्न उपस्थित होण्यास कारणीभूत ठरून जातात, तेव्हा त्यातील गांभीर्य अधिकच वाढून जाते.

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी आपापली तयारी सुरू केली आहे. किती जागा लढायच्या, कुठून लढायच्या व तिथे उमेदवार कोण द्यायचे हा नंतरचा विषय; परंतु प्राथमििक स्तरावर पक्ष संघटनात्मक बळ वाढविण्यावर सर्वांचाच भर आहे. अर्थात, बाहुबली व कार्यकर्त्यांची मोठी फळी असलेले पक्ष यात आघाडीवर असले आणि त्यांचे यासंदर्भातील प्रयत्न अधिक दखलपात्र अगर लक्षवेधी असलेत तरी, लहान किंवा तुलनेने कमी आवाका असलेले पक्षही मागे नाहीत. कारण, पक्षबळावरच तर ‘युती’ किंवा आघाडीतील त्यांचा समावेश व तडजोडीच्या फॉर्म्युल्यातील महत्त्व अवलंबून असते. त्यासाठी पक्षाचा गड असलेला भागवगळता जागोजागी पक्ष-संघटनेचे अस्तित्व असणे व ते कसल्या तरी निमित्ताने दाखवून देणेही गरजेचे ठरते. याच संदर्भाने राष्ट्रीय समाज पक्षाच्या जिल्हा पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा नाशकात आयोजिण्यात आला होता. त्यात या पक्षाचे संस्थापक अध्यक्ष, राज्याचे दुग्धविकास व पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी ब्रह्मचाºयाच्या शापवाणीचा संदर्भ दिल्याने त्यासंबंधीच्या चर्चांना संधी मिळून गेली आहे.


‘रासप’च्या प्रस्तुत मेळाव्यात निवडणुकीच्या दृष्टीने कामाला लागण्याचे आवाहन करतानाच जानकर यांनी पक्ष-संघटना बळकट करण्यावर भर दिला, पण ते करताना सद्य:स्थितीतील पक्षाच्या नाजूकअवस्थेबद्दलची त्यांची तीव्र नारराजी लपून राहू शकली नाही. आपल्या गल्लीत, चौकात पक्षाची शाखा नसतानाही नगरसेवक बनण्याची स्वप्ने पाहणाºयांच्या बळावर पक्ष कसा वाढेल, असा रास्त सवाल करीत त्यांनी सुस्तावलेल्यांचे चांगलेच कान उपटले. पदाधिकाºयांचा मेळावा असताना मोजके पदाधिकारी वगळता फारसे कुणी त्यास उपस्थित न राहिल्यातून जानकर यांचा त्रागा वाढणे स्वाभाविकही होते. कारण, राज्याच्या मंत्रिमंडळात सहभागी असणाºया नेत्याचे पक्ष संघटन असे कमकुवत आढळणे हे त्या नेत्याच्या नेतृत्व क्षमतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे असते. त्यामुळे जानकर यांनी नाशकातील व संघटनेतील मरगळ झटकण्यासाठी ‘अल्टिमेटम’ देणे किंवा आपल्या पक्षधुरीणांची ‘हजेरी’ घेणेही गैर नाहीच; परंतु ते करताना ‘मला फसवू नका, ब्रह्मचारी माणूस आहे; शाप लागेल’ अशा शब्दात त्यांनी भीतीचे बीजारोपणही करून दिल्याने, खरेच तसे काही असते का, असा प्रश्न उपस्थित होऊन गेला आहे.

अपेक्षा अधिक असताना किमान पातळीचे यशही जेव्हा लाभत नाही, तेव्हा होणाºया अपेक्षाभंगातून कुणाही व्यक्तीचे स्वत:वरचे नियंत्रण ढासळते, हा तसा समाज व मानसशास्त्राच्याही अंगाने येणारा अनुभव आहे. त्यामुळे जानकर यांचे तसे झाले असावे व त्यातून ही शापवाणी प्रकटली असावी; परंतु पुरोगामित्वाचा लौकिक व वारसा लाभलेल्या राज्यातील, की ज्या राज्याने देशात पुढचे पाऊल टाकत अंधश्रद्धांच्या निर्मूलनाला बळकटी प्राप्त करून देणारा कायदा करण्याचे प्रागतिक पाऊल उचलले; त्यातील मंत्रिमहोदयांनीच ब्रह्मचाºयाच्या शापाचे दाखले देऊन पक्ष-संघटना बांधण्याच्या दृष्टीने ‘झाडाझडती’साठी त्याचा उपयोग करून घ्यावा हे आश्चर्याचेच नव्हे, तर आक्षेपार्हही ठरावे. अंधश्रद्धा कायद्याच्या कचाट्यात आली; पण सुज्ञांच्या मनातून-डोक्यातून काही निघू शककली नाही, हेच यातून लक्षात घेता यावे. समाजाचे व राज्याचे नेतृत्व करणारे कुठे घेऊन चालले आहेत आपल्या कार्यकर्त्यांना, असा प्रश्न त्यामुळेच उपस्थित होणारा आहे.

 

Web Title: 'Shapravani' to know!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.