शाब्बास भावा यमके!

By राजा माने | Published: July 30, 2018 03:07 AM2018-07-30T03:07:58+5:302018-07-30T03:08:11+5:30

नमस्कारमंडळी, इंद्रलोकांचा स्टार रिपोर्टर यमकेची तुमची ओळख आहेच! पण यमकेबद्दलची खास ओळख मात्र काही जणांना नसेल. तर इंद्रदरबाराने मराठी भूमीतील बातम्यांसाठी स्टार रिपोर्टर नेमण्याची जबाबदारी नारदमुनींवर सोपविली होती.

 Shabas brother brother! | शाब्बास भावा यमके!

शाब्बास भावा यमके!

Next

नमस्कारमंडळी, इंद्रलोकांचा स्टार रिपोर्टर यमकेची तुमची ओळख आहेच! पण यमकेबद्दलची खास ओळख मात्र काही जणांना नसेल. तर इंद्रदरबाराने मराठी भूमीतील बातम्यांसाठी स्टार रिपोर्टर नेमण्याची जबाबदारी नारदमुनींवर सोपविली होती. त्यावेळी हा यमके त्यांना सापडला! यमके हा आमच्या यमगरवाडीचा. त्याचं खरं नाव मन कवडे पण त्याचे मित्र त्याला ‘एमके’ म्हणायचे. पुढे ‘एमके’ या नावाचे ‘यमके’ असे बारसे कधी झाले हे आता कुणालाच आठवत नाही... यमके हा राजकुमार हिरानी यांच्या ‘पीके’चा डुप्लिकेट.
समोरच्या व्यक्तीचा हात हातात घेतला की, त्या व्यक्तीची भूतकाळ व भविष्यातील ‘मन की बात’ जाणण्याची दिव्यशक्ती जशी ‘पीके’कडे होती तशीच दिव्यशक्ती यमकेलाही लाभली होती. नेमक्या त्याच कारणाने नारदमुनींनी त्याची इंद्रलोकांचा ‘स्टार रिपोर्टर’ म्हणून नेमणूक केली. तेव्हापासून नारद यमकेचे महागुरू झाले... असा हा यमके आपला रिपोर्ट तयार करायच्या नादात असतानाच त्याला चक्क पीकेचाच फोन आला... रिंगटोन वाजू लागली... बाबा कहता है अब बस्स... अब बस्स...! ( यमकेने फोन घेतला बोलू लागला)
यमके : नमस्ते भाई... कैसे याद किया...
पीके : शाब्बास भावा यमके!
यमके : अरे भाई, वो शाब्बास राहुल है यमके नही! और तुमकू सावज-बिवज की माहिती चाहिये तो मेरे पास नही.
पीके : शाब्बास तुझे ही बोला, क्योंकि तूने साप छोडनेवाला रिपोर्ट जो दिया था...
यमके : भाई, अब मराठीमेच बोलता... आषाढी वारी हा मराठीभूमीचा श्रद्धेचा सोहळा असतो. तिथे वाईट काम करणाऱ्याला थाराच नसतो...
पीके : मुझे मालूम है, लेकिन मैने शाब्बासकी दुसरे कारण से दी है...
यमके : हो, बहुतेक महागुरूंनी मराठा आरक्षणासंदर्भात ज्या कंड्या पिकविण्याचा प्रयत्न केला असता तो मी होऊ दिला नाही. म्हणूनच ना...
( यमकेने नारदमुनींचे नाव उच्चारताच इच्छा नसताना एखाद्याने फेसबुकवर आपल्याला टॅग करावे अगदी तस्सेच तेथे महागुरू नारद प्रकटले...)
नारायण... नारायण!
नारद : काय यमके-पीके? कोण आणि कसल्या कंड्या पिकवतो आहे? (महागुरूच्या प्रश्नाने यमके चपापला.. )
यमके : प..प्रणाम महागुरू... काही नाही. पीके हिराणींच्या ‘संजू’च्या यशाच्या व हिंदीतील सैराट ‘धडक’ ची भट्टी जमली नसल्याच्या कंड्या मी पिकवत होतो...
नारद : असत्य बोलतोस..सरकारला जागे करायचे म्हणजे नक्की काय? प्रत्येक गावात तुमचे दोन गट. एका गटाने काही तरी केले म्हणून दुसरा गट काही तरी करणारच! राज्य पातळीवरील नेत्यांचेही तसेच..अनेक नेते आणि अनेक गट. कुणी गनिमी कावा,कुणी आसूडाची तर कुणी गांधीगिरीची भाषा करतोय. मला कंड्या पिकवतो म्हणता...
यमके : गुरुवर्य सगळे नेते त्यांचाच अजेंडा पुढे सरकवताहेत. उद्धवांना अचानक राम मंदिराची ओढ लागलीय. जिनिअस राज आपल्याच ढंगात आहेत. पवारसाहेब पण कडेकडेनेच पोहतायत.
नारद : म्हणूनच नरेंद्रभाऊंच्या साक्षीने निघालेला विशेष अधिवेशनाचा मार्ग बरा...

(तिरकस)

Web Title:  Shabas brother brother!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.